बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी म्हणजेच जिओ. जियोचे करोडो युअर्स आहेत. याच करोडो युजर्सना जियोने अलीकडेच दोन मोठे धक्के दिले आहेत, ज्यामध्ये कंपनीने युजर्समध्ये लोकप्रिय असलेले दोन पॉप्युलर रिचार्ज प्लॅन बंद केले. हे दोन्ही प्रीपेड प्लॅन होते. यातील एक रिचार्ज प्लॅन 249 रुपयांचा होता तर दुसरा रिचार्ज प्लॅन 799 रुपयांचा होता. कंपनीच्या 249 रुपयांच्या बजेट फ्रेंडली प्लॅनमध्ये लिमिटेड डेटा आणि महिन्याभारताची वॉलिडिटी ऑफर केली जात होती.
महिनाभराची व्हॅलिडिटी आणि कमी डेटा पाहिजे असणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन बेस्ट आहे. दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 799 रुपये होती. लाँग टर्म व्हॅलिडिटी पाहिजे असणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन बेस्ट होता. कंपनीने हे दोन्ही प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले असले तरी इतर अनेक प्लॅन पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध आहे. यातील दोन प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Jio ने बंद केलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत 249 रुपये आहे. या प्लॅनची व्हॉलिडिटी 28 दिवसांची आहे. जियोच्या या प्लॅनमध्ये दररोज 1GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा दिली जात होती. यासोबतच या प्लॅनमध्ये फ्री JioCinema, JioTV आणि JioCloud चा ऍक्सेस देखील ऑफर केली जाणार आहे. हा एक बजट-फ्रेंडली प्लॅन आहे, यासोबतच डेटा, कॉलिंग आणि SMS ची गरज पूर्ण करणार आहे
रिलायंस जियोच्या 799 रुपयांचा प्लॅन प्लॅन My Jio अॅप आणि वेबसाइटवरून काढून टाकण्यात आला आहे. आता फोनपे, गूगल पे, पेटीएमसह अनेक लोकप्रिय पेमेंट प्लेटफॉर्मवरून रिचार्ज केला जाऊ शकतो. या प्लॅनमध्ये 84 दिवसांचा व्हॉलिडिटीसह दररोज 1.5GB डेटा (एकूण 126GB), अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा दिली जाते. यासोबतच या प्लॅनमध्ये फ्री JioCinema, JioTV आणि JioCloud चा एक्सेस देखील दिला जाणार आहे.
कंपनीने 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केल्यानंतर आता युजर्स दुसऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहेत. 249 रूपयांच्या रिचार्ज प्लॅन ऐवजी आता युजर्स 239 रुपयांचा बजेट फ्रेंडली प्लॅन देखील खरेदी करू शकतात. हा एक बेस्ट अल्टरनेटिव ऑप्शन ठरणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा दिली जाते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 22 दिवसांची आहे.
जर तुम्ही जियोच्या 799 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन ऐवजी दुसरा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 889 रुपयांच रिचार्ज प्लॅन एक बेट ऑप्शन ठरू शकतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS/दिन आणि JioSaavn Pro सब्सक्रिप्शन देखील ऑफर केला जाणार आहे.