Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plans: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेन्शन फ्री! Jio, Airtel की VI; डेटा, कॉलिंग अन् किमतीत कोणाचा प्लॅन बेस्ट?

Jio vs Airtel vs VI Cheap Annual Recharge Plan: जिओ, एअरटेल आणि व्हीआय या सर्व कंपन्या ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन्स देतात. कोणत्या कंपनीचा वार्षिक प्लॅन सर्वात स्वस्त आहे आणि कोणता सर्वाधिक फायदे देतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 12, 2026 | 03:30 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • ३६५ दिवसांची वैधता अन् भरपूर फायदे
  • Jio, Airtel आणि Vi च्या वार्षिक प्लॅन्सची तुलना
  • कोणता प्लॅन आहे सर्वात फायदेशीर?
Recharge Plan: दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करताना तारीख लक्षात ठेवावी लागते. तर कधीकधी रिचार्ज विसल्यामुळे प्लॅन अचानक संपतात, यामुळे अनेक कामांमध्ये अडचण येते. यामुळे, अनेक युजर्स एका वर्षाच्या व्हॅलिडिटीचे रिचार्ज घेणे पसंत करतात. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या तिन्ही कंपन्या ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन्स देतात. मात्र, त्यांच्या किमती आणि फायदे सारखे नाहीत. काही कंपन्यांकडे कमी किमतीत फक्त कॉलिंगचे प्लॅन्स आहेत, तर काही कंपन्या अधिक डेटा आणि 5जी सुविधा देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एकदा रिचार्ज करून वर्षभराच्या त्रासातून सुटका हवी असेल, तर आधी या तीन कंपन्यांच्या प्लॅन्सपैकी कोणता रिचार्ड प्लॅन बेस्ट आहे, जाणून घ्या. (Jio, Airtel, VI)

Vivo V80 5G Discount: 7,200 mAh बॅटरीच्या Vivo 5G फोनवर मोठी सूट, फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील!

Airtel आणि VI चा १८४९ रुपयांचा प्लॅन सर्वात स्वस्त

जर तुम्हाला जास्त मोबाईल डेटाची गरज नसेल आणि फक्त कॉलिंगसाठी तुमचा नंबर अॅक्टिव्ह ठेवायचा असेल, तर तुम्ही एअरटेल आणि व्हीआयचे रु. १,८४९ चे वार्षिक प्लॅन्स पाहू शकता. दोन्ही कंपन्या ३६५ व्हॅलिडिटी देतात. याचा अर्थ असा की, एकदा रिचार्ज केल्यावर तुमचा नंबर संपूर्ण वर्षभर अॅक्टिव्ह राहील.

या प्लॅन्समध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण ३६५ दिवसांसाठी एकूण ३,६०० एसएमएस मिळतात. मात्र, यामध्ये दैनंदिन वापरासाठी इंटरनेट डेटा दिला जात नाही. ज्या .युजर्सच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वाय-फाय आहे आणि ज्यांना कमी मोबाईल डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स उपयुक्त ठरू शकतात.

इंटरनेट युजर्ससाठी Jioचा ३,५९९ रुपयांचा प्लॅन

जर तुम्ही दररोज मोबाईल इंटरनेट वापरत असाल, तर जिओचा ३,५९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो. यामध्ये ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज २.५ GB हाय-स्पीड डेटा मिळतो. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मेसेजेसची सुविधाही मिळते.

या प्लॅनमध्ये JioTV आणि JioAICloud सारख्या ॲप्सचा ॲक्सेस देखील मिळतो. पात्र युजर्सना जिओचे 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या भागांमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा लाभही घेता येईल. जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.

एअरटेलच्या ३,५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा

एअरटेलकडे ३,५९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील आहे. त्याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. युजर्सना दररोज २ GB हाय-स्पीड डेटा, देशभरात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. पात्र युजर्सना या प्लॅनअंतर्गत अनलिमिटेड 5G डेटाचा लाभही घेता येईल. परंतु, हे नेटवर्कच्या उपलब्धतेवर आणि कंपनीच्या अटी आणि शर्तींवर अवलंबून असेल. त्यामुळे, एअरटेल वापरकर्त्यांनी रिचार्ज करण्यापूर्वी आपल्या परिसरात 5G नेटवर्कची उपलब्धता तपासावी.

Vi कडे ३,४९९ रुपये आणि ३,५९९ रुपयांचे दोन वार्षिक प्लॅन्स

वोडाफोन आयडियाकडे (Vi) ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ३,४९९ आणि ३,५९९ रुपयांचे दोन प्लॅन्स आहेत. ३,४९९ च्या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटा मिळतो, तर ३,५९९ च्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो.

या प्लॅनअंतर्गत, युजर्सना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. विशेष गोष्ट म्हणजे, या वेळेत वापरलेला डेटा दैनंदिन डेटा मर्यादेतून वजा होत नाही. जे लोक रात्रीच्या वेळी भरपूर व्हिडिओ पाहतात, डाउनलोड करतात किंवा इंटरनेट वापरतात, त्यांच्यासाठी हे वैशिष्ट्य फायदेशीर ठरू शकते.

कोणत्या कंपनीची वार्षिक प्लॅन तुमच्यासाठी अधिक चांगली?

जर तुम्हाला फक्त कॉल करायचे असतील आणि तुमचे सिम पूर्ण वर्षभर चालू ठेवायचे असेल, तर एअरटेल आणि व्हीआयचा १,८४९ रु. चा प्लॅन कमी किमतीत एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला दररोज जास्त डेटा हवा असेल, तर जिओच्या ३,५९९ रु. च्या प्लॅनमध्ये दररोज २.५ GB डेटा मिळतो. एअरटेलच्या ३,५९९ रु. च्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो.दुसरीकडे, जे लोक रात्रीच्या वेळी जास्त इंटरनेट वापरतात त्यांच्यासाठी Vi चे ३,४९९ रु किंवा ३,५९९ रु. चे प्लॅन्स उपयुक्त ठरू शकतात.

Google Pixel Drop नोव्हेंबर 2026 अपडेट रिलीज; पिक्सेल 10 मध्ये ‘रॅम्बलर एआय’सह अनेक जबरदस्त फीचर्स दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: Jio, Airtel आणि Vi पैकी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन कोणता?

    Ans: Airtel आणि Vi चा 1,849 रुपयांचा प्लॅन सर्वात स्वस्त आहे.

  • Que: Jio च्या 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये किती डेटा मिळतो?

    Ans: दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात.

  • Que: Vi च्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो का?

    Ans: होय, रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट डेटा मिळतो.

Web Title: Jio vs airtel vs vi cheapest best annual data recharge plans pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Airtel Data Plan
  • annual recharge plan
  • jio
  • mobile recharge
  • vodafone idea

संबंधित बातम्या

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश
1

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा
2

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.