Jio vs Airtel vs Vi: 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोण देतं सर्वात जास्त बेनेफिट्स? कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट? जाणून घ्या
Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्यांचे करोडो युजर्स आहेत. या तीन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना 50 रुपयांपासून ते अगदी 4000 रुपयांपर्यंतच्या किंमतीचे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. यातील काही प्लॅन्स पोस्टपेड असतात तर काही प्लॅन्स प्रीपेड असतात. या प्लॅन्समध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सुविधा दिली जाते. तर असे देखील काही प्लॅन्स असतात ज्यामध्ये केवळ डेटा ऑफर केला जातो.
Nothing Phone 3 बाबत समोर आली नवीन अपडेट, असा असणार स्मार्टफोनचा रियर पॅनल! फोनला मिळणार नवा लूक
तिन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमतीचे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो तिन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात. म्हणजे या रिचार्ज प्लॅनची किंमत तिन्ही कंपन्यांमध्ये एकच आहे, पण प्लॅनमध्ये ऑफर केले जाणारे फायदे वेगवेगळे आहेत. आम्ही बोलत आहोत तिन्ही कंपन्यांच्या 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल. Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) या तिन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. पण तिन्ही रिचार्ज प्लॅनमधील फायदे वेगवेगळे आहेत. आता आम्ही तुम्हाला या तिन्ही रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्याला समजेल की कोणती कंपनी सर्वात चांगले फायदे देते. (फोटो सौजन्य – Pinterest)
Jio च्या पोर्टफोलियोमध्ये 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या ग्राहकांना रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस ऑफर करते. या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग देखील दिली जाते. याशिवाय Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ टिव्ही आणि AI Cloud चा फ्री अॅक्सेस देखील दिला जात आहे. यासोबतच, JioHotstar चे सब्सक्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये फ्रीमध्ये ऑफर केले जात आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा रिजार्ज प्लॅन ऑफिशियल वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.
टेलीकॉम कंपनी Airtel त्यांच्या युजर्सना या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटा आणि 100 एसएमएस ऑफर करते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. याशिवाय, प्रीपेड पॅकमध्ये फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस देखील दिला जात आहे. Airtel ऑफर करत असलेल्या या 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जात नाही. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा रिजार्ज प्लॅन ऑफिशियल वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.
स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हीही IP रेटिंग तपासता? यातील अंकाचा खरा अर्थ माहिती आहे का? जाणून घ्या
वोडाफोन आइडियाच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएससह 1GB डेटा दिला जात आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जात नाही. तसेच वीकेंड डेटा रोलओवरचे फायदे देखील या प्लॅनमध्ये ऑफर केले जात नाहीत.