Tech Tips: स्मार्टफोनची ही हिडन सेटिंग यूजर्ससाठी ठरणार वरदान, लॉक स्क्रीन नोटिफिकेशनसह आणखी काय खास?
कॅमेऱ्यापासून नोटिफिकेशनपर्यंत आपल्या स्मार्टफोनमध्ये प्रत्येक कामासाठी वेगवेगळी सेटिंग दिलेली असते. यासगळ्यासोबतच आपल्या स्मार्टफोनमध्ये काही हिडन सेटिंग देखील दिलेल्या आहे, ज्याबद्दल अनेक युजर्सना माहिती नाही. स्मार्टफोनमधील अशाच काही हिडन सेटिंगबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुमचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.
फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? फोनमध्ये आत्ताच डाऊनलोड करा हे ॲप, पंतप्रधान मोदींनीही दिलाय सल्ला
स्मार्टफोनमध्ये आडियो, व्हिडीओ आणि आपल्या महत्वाच्या फाइल्स सुरक्षित ठेवणे असो नाहीतर अनावश्यक जाहिरातीपासून मुक्ती मिळवणं असो, आपल्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळी सेटिंग दिलेली असते. मात्र 90 टक्के स्मार्टफोन युजर्सना या सेटिंगबद्दल माहिती नसते. यामुळेच आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील अशाच काही सेटिंगबद्दल सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा तीन हिडन सेटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून स्मार्टफोन युजर्स अधिक स्मार्ट बनू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
आपला पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलने स्मार्टफोनमध्ये अनेक सिक्योरिटी फीचर्स दिले आहेत. ही सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. सर्वात आधी फोनच्या सेटिंगमधे जा आणि सिक्योरिटी अँड प्रायवसी लास्ट डिव्हाईस प्रोटेक्शन थेफ्ट प्रोटेक्शनवर टॅप करा. यामधील पहिलं फीचर ‘थेफ्ट डिटेक्शन लॉक’ आहे, म्हणजेच जर स्क्रीनवर डिटेक्ट झालं की तुमचा फोन कोणी चोरी केला आहे तर फोन स्वतः लॉक होणार आहे. यामुळे स्मार्टफोनमधील तुमचा पर्सनल डेटा कोणीही अॅक्सेस करू शकणार नाही.
याशिवाय अँड्रॉइडमध्ये नवीन ऑफलाइन डिव्हाईस लॉक फीचर देखील देण्यात आले आहे. यामध्ये सर्वात खास फीचर आहे- ‘रिमोट लॉक’. तुमच्या स्मार्टफोनमध्ये जर हे फीचर एनेबल असेल तर तुम्ही लॅपटॉपसारख्या दुसऱ्या डिव्हाइसवरून (ज्यामध्ये तुमचे गुगल अकाउंट लॉग इन केलेले आहे) फोन लॉक करू शकता.
जर तुम्ही गूगल सर्विसेजचा वापर करत असाल तर तुमच्या सर्च हिस्ट्रीच्या आधारवर जाहिराती दिसतात. अनेक वेळा अनावश्यक जाहिरातींचा पाऊस येतो. आपल्याला या जाहिरातींचा कंटाळा येतो. मात्र या जाहिराती बंद करणं शक्य नाही. पण आपण या जाहिराती बदलू शकतो. प्रत्येक गुगल अकाउंटमध्ये एक यूनिक अॅडवरटाइजिंग आयडी असतो, जो तुमच्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करतो. जर तुम्हाला तुमचा डेटा शेअर करायचा नसेल तर तुम्ही हा आयडी डिलिट करू शकता, ज्यामुळे नवीन जाहिराती सुरू होणार आहेत. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन गूगल ऑल सर्विसेज अॅडवर क्लिक करा. यानंतर डिलीट अॅडवरटाइजिंग आईडीचा ऑप्शन निवडा. ज्यामुळे तुमची ही आयडी रिसेट होणार आहे.
लॉक स्क्रीनवर तुम्ही ओटीपी, बँक मेसेज किंवा व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन्स पाहू शकता. बऱ्याचदा त्यात महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती असते. तथापि, नोटिफिकेशन्ससाठी प्रत्येक वेळी फोन अनलॉक करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही महत्त्वाचा कंटेंट लपवण्यासाठी फोनमध्ये काही सोपी सेटिंग करू शकता. यानंतर लॉक स्क्रीनवर नोटिफिकेशन आल्यावर फक्त अॅपचा आयकॉन दिसेल. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल, नोटिफिकेशन लॉक स्क्रीन नोटिफिकेशन आणि ‘ hide content’ वर क्लिक करावे लागेल.