Samsung च्या Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर, फोल्डेबल फोनसह हे गॅजेट्स होणार लाँच; असं पाहू शकता लाईव्ह स्ट्रिमिंग
गेल्या काही दिवसांपासून टेक कंपनी सॅमसंगच्या आगामी Unpacked 2025 ईव्हेंटबाबत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. जुलै महिन्यात सॅमसंगचा इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी फोल्ड आणि फ्लिप फोनसह आणखी काही गॅझेट्स लाँच करणार आहे. चला तर मग सॅमसंगच्या आगामी इव्हेंटबाबत जाणून घेऊया.
काय सांगता! जुलै महिन्यात पडणार स्मार्टफोनचा पाऊस, मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी या कंपन्या सज्ज
गेल्या काही काळापासून रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार असा अंदाज लावला जात आहे की, हे नवीन फोल्डेबल डिव्हाईस Samsung च्या आगामी Unpacked 2025 ईव्हेंटमध्ये लाँच केले जाऊ शकतो. सॅमसंगचा आगामी ईव्हेंट 9 जुलै रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे नेक्स्ट-जेन फोल्डेबल डिव्हाईस लाँच करणार आहे. रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगितलं जात आहे की, ईव्हेंटमध्ये कंपनी केवळ गॅलेक्सी फोल्ड आणि फ्लिपच नाही तर अनेक नवीन डिव्हाईस देखील लाँच करण्याची शक्यता आहे. नवीन फोन गॅलेक्सी फ्लिप 7 FE नावाने सादर केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ट्रिपल-फोल्डेबल डिव्हाईससाठी ग्राहकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. याशिवाय ईव्हेंटमध्ये गॅलेक्सी वॉच 8 सीरीजबाबत देखील खुलासा होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये वॉच 8, वॉच 8 क्लासिक आणि वॉच अल्ट्रा 2 यांचा समावेश आहे.
Samsung’s Summer Unpacked event is scheduled for July 9, 2025.
Expected products
📱 Galaxy Z Fold 7
📱 Z Flip 7
📱 Z Flip 7 FE/special edition name not confirmed⌚ Watch 8
⌚ Watch 8 Classic
⌚ Watch Ultra 2🎧 Buds Core#GalaxyUnpacked #Samsung pic.twitter.com/POpheMroRD
— Abhishek Yadav (@yabhishekhd) June 19, 2025
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 ईव्हेंट पुढील महिन्यात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. टिपस्टर, इवान ब्लासने दिलेल्या माहितीनुसार, आगामी ईव्हेंट 9 जुलै रोजी आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. त्यांनी अस देखील सांगितलं आहे की, हा ईव्हेंट सकाळी 10 वाजता EDT ने सुरू होणार आहे. ज्याचा अर्थ भारतात हा ईव्हेंट संध्याकाळी 7 वाजता IST पाहता येणार आहे. सॅमसंगने अद्याप या ईव्हेंटबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनी एका नवीन फोल्ड फोनला टीज करत आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनीचा नवीन फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो. हा आगामी ईव्हेंट कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे.
आगामी ईव्हेंट सुरू होण्यापूर्वी कंपनीने त्यांच्या अपकमिंग गॅलेक्सी फोल्ड 7 बाबत काही माहिती शेअर केली आहे. अलिकडेच कंपनीने सांगितलं आहे की, फोल्ड 7 मध्ये AI-पावर्ड फीचर्ससह एक मोठा डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. यावेळी फोल्डेबलमध्ये थोडी रुंद 6.5-इंचांची कवर स्क्रीन आणि स्लिमर प्रोफाइल दिली जाईल. जी अनफोल्ड झाल्यावर केवळ 3.9 मिमी जाड दिसणार आहे.
या दमदार प्रोसेसरसह लाँच होणार Nothing Phone 3 स्मार्टफोन, इतर स्पेसिफिकेशन्सही आले समोर
Galaxy Z Fold 7, Flip 7 सोबत, यावेळी कंपनी युजर्सना स्वस्त फ्लिप फोनचं सरप्राईज देखील देऊ शकते. जो गॅलेक्सी झेड फ्लिप 7 एफई म्हणजेच फॅन एडिशन म्हणून लाँच केला जाऊ शकतो. हे बजेट-फ्रेंडली मॉडेल सुमारे 60 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. फोल्ड आणि फ्लिप फोनसह, कंपनी गॅलेक्सी वॉच 8 आणि वॉच 8 क्लासिक देखील ईव्हेंटमध्ये सादर करू शकते.