
Tech Tips: Smart Ring खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर कराल पश्चाताप
आजच्या डिजीटल जगात स्मार्ट रिंग एक नवीन आणि स्टाइलिश वियरेबल गॅजेट बनलं आहे. स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडप्रमाणेच, स्मार्ट रिंग देखील हार्ट रेट, झोपेची गुणवत्ता, एक्टिविटी लेवल आणि इतर हेल्थसोबत जोडलेला डेटा ट्रॅक करते. तुम्ही देखील अशी एखादं स्मार्ट रिंग खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. स्मार्ट रिंग खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरेजचं आहे. नाहीतर खरेदीनंतर तुम्हाला पश्चाताप होईल आणि तुमचे पैसे देखील वाया जातील. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी हे ठरवा की तुम्हाला स्मार्ट रिंगचा वापर कोणत्या कामासाठी करायचा आहे, जसं की फिटनेस ट्रॅकिंग, हेल्थ मॉनिटरिंग की नोटिफिकेशन अलर्टसाठी स्मार्ट रिंगची गरज आहे हे ठरवा. मित्राकडे स्मार्ट रिंग आहे म्हणून मला पण पाहिजे हा विचार करून कधीही स्मार्ट रिंग खरेदी करू नका.
रिंगमध्ये उपलब्ध असलेले सेंसर जसे हार्ट रेट, SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि एक्टिविटी सेंसर किती अचूक आणि प्रगत आहेत, याबाबत खरेदीपूर्वी माहिती घ्या. याशिवाय आरोग्य वैशिष्ट्यांना कोणत्याही आरोग्य संस्थेने प्रमाणित केले आहे की नाही याबाबत देखील माहिती मिळवा. हेल्थ फीचर्ससाठी सामान्यतः एफडीएचे सर्टिफिकेशन मिळते.
एका चांगल्या स्मार्ट रिंगची बॅटरी लाईफ 4 ते 7 दिवस चालते. जर स्मार्ट रिंगची चार्चिंज वारंवार संपत असेल तर वैताग येतो. स्मार्टवॉच आणि स्मार्ट रिंग दोन्हीची बॅटरी क्षमता वेगळी आहे, म्हणून जलद चार्जिंग, चार्जर आणि बॅटरी तपासा.
स्मार्ट रिंगचा आकार तुमच्या बोटाला फीट होणं गरजेचं आहे आणि दिर्घ काळासाठी आरामदायक वाटला पाहिजे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांच्या साइटवरच अंगठीचा आकार वापरून पाहण्याची व्हर्च्युअल सुविधा देत आहेत.
स्मार्ट रिंग कोणत्या अॅप्ससह काम करते आणि ते अॅप डेटा किती चांगल्या प्रकारे प्रदर्शित करते हे देखील विचारात घेण्यासारखे आहे. स्मार्ट रिंगसाठी अॅप खूप महत्वाचे आहे, कारण बहुतेक स्मार्ट रिंग्जमध्ये डिस्प्ले नसतो.
स्मार्ट रिंगची बॅटरी किती दिवस चालते?
४ ते ७ दिवस
स्मार्ट रिंगमध्ये कोणते फीचर्स असतात?
हार्ट रेट, SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि एक्टिविटी सेंसर