
तुमचा फोन पाण्यात पडल्यास नेमकं काय कराल? 'या' गोष्टी तातडीने करा अन्...
नवी दिल्ली : तुमचा स्मार्टफोन जर पाण्यात पडला असेल किंवा भिजला असेल, तर आता टेन्शन घेऊ नका. फोन पाण्यात पडणे म्हणजे मोठे नुकसान असे आपल्याला वाटते. कारण बहुतेक कंपन्या ‘लिक्विड डॅमेज’वर वॉरंटी देत नाहीत. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगली तर तुमचा फोन पुन्हा सुस्थितीत येऊ शकतो.
फोन पाण्यात पडल्यावर काही गोष्टी तातडीने करा. त्यात फोन पाण्यातून काढल्याबरोबर तो स्विच ऑफ करा, फोन चालू राहिल्यास शॉर्ट सर्किट होऊन तो कायमचा खराब होऊ शकतो. त्यासाठी कव्हर आणि अॅक्सेसरीज काढा. फोनवर कव्हर असेल तर ते लगेच काढून टाका. तसेच सिम कार्ड ट्रे, मेमरी कार्ड बाहेर काढा, जेणेकरून हवा आत जाऊ शकेल. कोरड्या कपड्याने पुसा. फोन एका मऊ आणि कोरड्या कापडाने वरून पूर्णपणे पुसून घ्या. चार्जिंग पोर्ट आणि हेडफोन जॅकच्या ठिकाणी जमा झालेले पाणी कापसाने टिपून घेण्याचा प्रयत्न करा. हवेशीर अशा ठिकाणी फोन ठेवा. फोन पुसल्यानंतर पूर्णपणे सुकेपर्यंत चार्जिंगला लावू नका.
तसेच काही चुका टाळल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात हेअर ड्रायरचा वापर टाळा अनेक जण फोन सुकवण्यासाठी ड्रायर वापरतात. ड्रायरची गरम हवा फोनच्या नाजूक अंतर्गत भागांना वितळवू शकते किंवा डॅमेज करू शकते. पाणी काढण्यासाठी फोन हलवणे किंवा झटकणे चुकीचे आहे. यामुळे बाहेर असलेले पाणी फोनच्या अधिक खोलवर जाऊ शकते.
फोन कधीही ठेऊ नका उन्हात
कडक उन्हात फोन ठेवल्याने बॅटरी आणि स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते, तरीही फोन सुरू झाला नाही तर? २४ तास सुकवल्यानंतरही तुमचा फोन सुरू होत नसेल, तर अधिकृत सर्व्हिस सेंटरवर घेऊन जाणेच हिताचे ठरेल.
हेदेखील वाचा : APK Scams: बनावट ॲप्सपासून सुरक्षित रहा! योग्य मार्गदर्शन आवश्यक, काय आहे APK Files