तुम्हाला माहीत आहे का सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या ईमोजीचा रंग पिवळा का असतो? जाणून घ्या
तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुम्हाला सोशल मीडियावरील ईमोजींबद्दल नक्कीच माहीत असेल. सध्या भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबूक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांचा समावेश होतो. प्रत्येक सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ईमोजी पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा केवळ इमोजीचा वापर एखाद्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी केला जातो. दरवर्षी १७ जुलैला वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो.
हेदेखील वाचा- Infinix चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि धमाकेदार फीचर्स
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक प्रकारचे ईमोजी आहेत. हसणं, रडणं, रागवणं, चिडणं, प्रेम करणं, अशा प्रत्येक गोष्टीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक विशिष्ट ईमोजी उपलब्ध आहे. प्रत्येक सोशल मीडिया युजर या ईमोजीचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का इमोजीचा रंग पिवळा का असतो? आज आम्ही तुम्हाला इमोजीचा रंग पिवळा का असतो हे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य -pinterest)
इंटरनेटच्या या आधुनिक जीवनात बहुतेक लोक बोलण्याऐवजी चॅटिंगला प्राधान्य देतात. लोक चॅट करण्यासाठी WhatsApp, फेसबूक, इंस्टाग्राम आणि इतर अनेक मेसेजिंग ॲप्स वापरतात. इतकेच नाही तर लोक त्यांचे संभाषण आकर्षक आणि मनोरंजक बनवण्यासाठी अनेक प्रकारचे इमोजी आणि स्मायली वापरतात. तुम्हीही त्यांचा अनेकदा वापर केला असेल. पण इमोजीचा रंग फक्त पिवळा का असतो हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का?
हेदेखील वाचा- तुमच्या स्मार्टफोनला वर्षानुवर्षे स्मार्ट ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स, आत्ताच फॉलो करा
इंटरनेटवर तुम्हाला नेहमी पिवळ्या रंगात इमोजी किंवा स्मायली दिसतील. तज्ञांनी याचे कोणतेही विशेष कारण दिलेले नाही. काही तज्ञांच्या मते इमोजीचा रंग एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या टोनशी साधर्म्य साधण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विशिष्ट त्वचेच्या रंगाचे इमोजी तयार करणे देखील वर्णद्वेषी दिसू शकते. काही लोकांचा असा विश्वास आहे की हसरा चेहरा पिवळा दिसतो, म्हणून इमोजीचा रंग पिवळा ठेवण्यात आला आहे. बहुतेक लोक म्हणतात की पिवळा रंग आनंदाचे प्रतीक आहे. या रंगात भावना चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या जातात म्हणूनच इमोजीचा रंग पिवळा म्हणून निवडला गेला आहे. काहींच्या मते पिवळा रंग आपल्या डोळ्यांना त्रास देत नाही. पिवळा रंग फार भडक किंवा फार गडद नाही.
सोशल मीडियावर इमोजीचा वापर इतका वाढला आहे की आज बहुतेक लोक काही बोलण्याऐवजी किंवा भावना व्यक्त करण्याऐवजी इमोजीचा वापर करतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल की लोक प्रेम, राग आणि इतर भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी वापरतात. शब्दांशिवाय, वापरकर्ते इमोजीद्वारे त्यांचा संदेश इतर व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. सोशल मीडिया चॅटवर तुम्ही बहुतेक प्रकारचे इमोजी सहजपणे पाहू शकता.