तुमच्या स्मार्टफोनला वर्षानुवर्षे स्मार्ट ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स, आत्ताच फॉलो करा
Smartphone Tips: आपण दर आठवड्याला किंवा दर महिन्याला नवीन स्मार्टफोन खरेदी करत नाही. एकदा स्मार्टफोन खरेदी केला की तो 3 ते 4 वर्षे वापरतो आणि त्यानंतर आपण दुसरा नवीन स्मार्टफोन खरेदी करतो. आपली सर्व कामं स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज शक्य होतात. त्यामुळे आपल्याला आपला स्मार्टफोन दीर्घकाळ टिकवणं महत्त्वाचं असतं. स्मार्टफोनला दिर्घकाळ टिकवण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्मार्टफोनची स्मार्ट केअर करणं. तुमच्या स्मार्टफोनला वर्षानुवर्षे स्मार्ट ठेवण्यासाठी तुम्ही त्याची कशी स्मार्ट काळजी घेऊ शकता, यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.
हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत
स्मार्टफोनची स्क्रीन हा फोनचा सर्वात नाजूक भाग आहे. अशा परिस्थितीत थोडासा निष्काळजीपणाही फोनच्या स्क्रीनला मोठे नुकसान पोहोचवू शकतो. स्क्रीनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षित ठेवा आणि वेळोवेळी मऊ कापडाने स्वच्छ करा. स्क्रॅचपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही स्क्रीन प्रोटेक्टर वापरू शकता.
फोन खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही स्मार्टफोनसाठी चांगली केस आणि कव्हर खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की कव्हर खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे कारण यामुळे फोनचे नुकसान करू शकते.
फोन दीर्घकाळ वापरण्यासाठी, त्याच्या बॅटरीच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी घ्या. अधिक वारंवार चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते. शक्य असल्यास, तुम्ही ऑप्टिमायझेशन ॲप्स वापरून बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता. तसेच, फोन फक्त मूळ चार्जरने चार्ज करा.
हेदेखील वाचा- ॲप डिलीट केल्यानंतरही तुमचे डिटेल्स राहतात सेव्ह, सुरक्षेसाठी आताच फोनेमध्ये करा ही सेटिंग्ज
अनेक स्मार्टफोन कंपन्या आता तीन ते पाच वर्षांची सुरक्षा आणि सॉफ्टवेअर अपडेट देत आहेत. नवीन फोन खरेदी करताना याला प्राधान्य द्या. तुमच्या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा, कारण ते सुरक्षित कामकाजासाठी महत्त्वाचे आहे.
फोनच्या सुरळीत परफॉर्मन्समध्ये डेटा देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणजेच फोनमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त डेटा असेल तर फोन नीट काम करू शकणार नाही. फोनमधील अनावश्यक डेटा वेळोवेळी डिलीट करत रहा. तसेच तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक चांगला अँटीव्हायरस आणि सिक्युरिटी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि तुमचा डेटा सुरक्षित ठेवा.
तुमच्या स्मार्टफोनमधून निरुपयोगी ॲप्स काढून टाका आणि तुमचा डेटा तुमच्या गरजेनुसार स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. तसेच तुमच्या स्मार्टफोनवर वेळोवेळी तुमच्या डेटाचा बॅकअप तयार करा आणि तो Google Drive किंवा हार्ड ड्राइव्हसारख्या सुरक्षित ठिकाणी साठवा.
तुमचे ॲप्स आणि डेटा सुरळीत चालण्यासाठी स्मार्टफोनचे योग्य नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्शन वापरा. चांगल्या नेटवर्कमध्ये फोनची बॅटरीही जास्त असते.
तुमचा स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला जाण्यापासून रोखण्यासाठी पॅटर्न लॉक, पिन किंवा फिंगरप्रिंट लॉक यासारख्या स्मार्टफोन सुरक्षा उपायांचा वापर करा.
ॲप्स आणि ब्राउझरमधील कॅशे डेटा तुमच्या फोनचे स्टोरेज भरू शकतो आणि त्याचा वेग कमी करू शकतो. कॅशे नियमितपणे साफ करणे महत्वाचे आहे. यासाठी Settings > Storage > Cache Data वर जा आणि क्लिअर करा.
ॲनिमेशन्सची गती कमी केल्याने सिस्टम जलद प्रतिसाद देते. सेटिंग्ज > डेवलपर ऑप्शन्स > विंडो ॲनिमेशन स्केल, ट्रान्झिशन ॲनिमेशन स्केल आणि ॲनिमेटर कालावधी स्केल 0.5x किंवा बंद करा.
तुमचा फोन वेळोवेळी रीबूट करा. हे पार्श्वभूमीत चालणाऱ्या अनावश्यक प्रक्रिया थांबवते आणि RAM मोकळी करते.