Infinix चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि धमाकेदार फीचर्स
टेक कंपनी Infinix ने त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. डिजीटल दुनियेतील फोल्डेबल स्मार्टफोनच्या शर्यतीत आता Infinix देखील सहभागी झाला आहे. कंपनीने Infinix Zero Flip नावाचा स्मार्टफोन सध्या जागतिक बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो असे सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही तारीख समोर आली नाही किंवा कंपनीने देखील यासंबंधित अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. Xiaomi आणि Samsung नंतर आता Infinix देखील फोल्डेबल स्मार्टफोनच्या विक्रीत सहभागी झाला आहे.
हेदेखील वाचा-सॅमसंग इंडियाकडून जगातील पहिले AI-पॉवर्ड टॅब्लेट्स लाँच! क्रिएटिव्ह टूल्स आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज
सध्या अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोनसोबतच फोल्डेबल फोनची क्रेझ देखील वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयफोनप्रमाणेच एखाद्या चांगल्या कंपनीचा फोल्डेबल फोन सध्या स्टेटस सिम्बॉल बनले आहे. टेक कंपनी Samsung आणि त्यानंतर Xiaomi ने त्यांचा फोल्डेबल फोन लाँच केला आहे. आता यामध्ये Infinix देखील सहभागी झाला आहे. Infinix ने Infinix Zero Flip नावाचा फोल्डेबल स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. (फोटो सौजन्य – Infinix)
Infinix Zero Flip मध्ये 6.9 इंचाचा FHD+ LTPO AMOLED डिस्प्ले आहे. हे 120Hz रीफ्रेश रेट आणि 1400 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोल्ड फोनमध्ये दुसरा 3.64 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण आहे.
Infinix Zero Flip मध्ये MediaTek डायमेंशन 8020 चिपसेट आहे, जो 8GB व्हर्च्युअल रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह जोडलेला आहे. Infinix Zero Flip फोन ब्लॉसम ग्लो आणि रॉक ब्लॅक रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
नवीनतम फोल्डेबल फोनमध्ये 50MP Samsung GN5 OIS सेन्सर आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, यात ऑटोफोकससह 50MP Samsung JN1 सेन्सर आहे. ज्यामुळे तुमचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होईल.
हेदेखील वाचा-सायबर अटॅक! 19 रेल्वे स्थानकांचा वाय-फाय नेटवर्क झाला हॅक, तुम्हालाही महागात पडेल ही चूक
Infinix Zero Flip मध्ये 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,720mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 10W रिव्हर्स चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे.
Infinix Zero Flip मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, JBL ड्युअल स्पीकर, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC आणि USB टाइप C पोर्ट आहे.
Infinix Zero Flip फोन Android 14 वर आधारित आहे. यामध्ये Mediatek Dimensity 8020 (6 nm) चिपसेट देण्यात आला आहे.
Infinix Zero Flip ची 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 600 डॉलर म्हणजेच अंदाजे 50,183 रुपये आहे. नवीन फ्लिप फोन लवकरच इतर मार्केटमध्ये देखील लाँच केला जाईल. Infinix देखील भारतात झिरो फ्लिप लाँच करेल अशी अपेक्षा आहे.