Maharashtra Assembly Election 2024: मतदान केंद्र शोधताना गोंधळ उडतोय? निवडणूक आयोगाचं हे अॅप तुम्हाला करणार मदत
20 नोव्हेंबर 204 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. मतदान केंद्र देखील सज्ज आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मतदान आयोग देखील सज्ज झाला आहे.
निवडणुकीसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मतदान आयोगाने मतदारांसाठी वोटर हेल्पलाइन अॅप लाँच केलं आहे. हे अॅप तुम्हाला मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करणार आहे. वोटर हेल्पलाइन ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. हे ॲप युजर्सची कोणत्याही प्रकारची माहिती स्टोअर करत नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने 2019 मध्ये वोटर हेल्पलाइन ॲप सुरू केले होते. निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी हे ॲप वन-स्टॉप डेस्टिनेशन आहे. वोटर हेल्पलाइन ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप प्ले स्टोअरवरून विनामुल्य डाऊनलोड करू शकता.
मतदार यादीतील नाव – वोटर हेल्पलाइन ॲपच्या मदतीने मतदार फक्त एका क्लिकवर मतदार यादीत त्यांचं नाव शोधू शकतात. यासोबतच ते मतदान करण्यास पात्र आहेत की नाही हे देखील मतदारांना चेक करता येणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वोटर रजिस्ट्रेशन – जर तुमचा वोट रजिस्टर्ड नसेल तर या ॲपच्या मदतीने मतदार त्यांचे वोट निवडणूक यादीत रजिस्टर शकतात. यासोबतच ते रजिस्ट्रेशन डिटेल्समधील चुका देखील या ॲपच्या मदतीने दुरुस्त करू शकता. त्यामुळे मतदारांना यासाठी कोणत्याही केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.
वोटर स्लिप डाउनलोड – वोटर हेल्पलाइन ॲपवरून, यूजर्स मतदानासाठी इलेक्टोरल रोल किंवा डिजिटल फोटो मतदार स्लिप डाउनलोड करू शकतात.
निवडणूक संबंधित डिटेल्स – वोटर हेल्पलाइन ॲपवर, आगानी निवडणूकीची माहिची, निवडणुकीचा निकाल आणि निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची माहिती मिळणार आहे.
वोटर हेल्पलाइन ॲपच्या मदतीने युजर्स त्यांचे नाव मतदार यादीत शोधू शकतात आणि मतदार यादी डाउनलोड करू शकतात. यासाठी त्यांना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.