Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta AI ने वाचवले जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचे प्राण; पोलिसांना दिला अलर्ट

लखनौमध्ये मेटाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने एका 21 वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. AI ने स्थानिक प्राधिकरणाला मुलीच्या हेतूबद्दल वेळीच सावध केले.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि मुलीचे प्राण वाचले. Meta AI सिस्टमने जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला व्हिडिओ फ्लॅग केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2024 | 10:36 AM
Meta AI ने वाचवले जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचे प्राण; पोलिसांना दिला अलर्ट (फोटो सौजन्य - pinterest)

Meta AI ने वाचवले जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचे प्राण; पोलिसांना दिला अलर्ट (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

मेटाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जीवन संपवण्यासाठी निघालेल्या एका 21 वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. लखनौमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी Meta AI ने पोलिसांना वेळेवर अलर्ट पाठवला ज्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला आहे. या कामगिरीमुळे Meta AI चे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाल असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट करत Meta AI चं कौतुक केलं आहे. Meta AI आता केवळ माहिती शोधणं किंवा गप्पा मारणं एवढंच काम करत नाही, तर तो एखाद्या व्यक्तिचा जीव देखील वाचवू शकतो.

हेदेखील वाचा- Vivo आणि Motorola स्मार्टफोनमध्ये येतेय ग्रीन लाइन; वैतागलेल्या युजर्सची कंपनीकडे तक्रार

लखनौमध्ये Meta AI ने एका प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Meta AI च्या कमाल फीचरमुळे एका मुलीचे प्राण वाचले आहेत. 21 वर्षीय मुलगी जेव्हा तिचं जीवन संपण्यासाठी टोकाचं पाऊल उचलत होती, त्यावेळी मुलीच्या हेतूबद्दल AI ने स्थानिक प्राधिकरणाला वेळीच सावध केले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. पोलिसांचं हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालं असून मुलीचे प्राण वाचले आहेत.

Meta AI ने एका मुलीचा जीव कसा वाचवला

रिपोर्ट्सनुसार, Meta AI सिस्टमने जीवन संपवण्यासाठी निघालेल्या मुलीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला व्हिडिओ फ्लॅग केला. या व्हिडिओमध्ये 21 वर्षीय मुलगी गळ्यात फास बांधलेली दिसत आहे. यासोबतच या मुलीने गळ्यात फास घेऊन आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

हेदेखील वाचा- अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम

वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लखनौमधील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सोशल मीडिया सेंटरचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर लखनऊमधील पोलीस महासंचालकांच्या सोशल मीडिया सेंटरने तातडीने कारवाई केली. सतर्कतेनंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली. मुलीच्या लोकेशनची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले. महिला अधिकाऱ्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अशाप्रकारे तातडीने समुपदेशन करून मुलीचे प्राण वाचले.

मुलीने टोकाचं पाऊल का उचललं?

आत्महत्या करायला निघालेल्या या मुलीचे चार महिन्यांपूर्वी आर्य समाज मंदिरात लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. काही वेळाने मुलीचा पती तिला सोडून गेला. ज्याचा परिणाम मुलीच्या मानसिक स्थितीवर झाला. तिचा नवरा गेल्यानंतर तिला एकटं आणि नैराश्य वाटू लागलं. या सर्व प्रकारामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं.

अशा प्रकरणांमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची मदत घेतली जाऊ शकते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी मानसिक तणावातून जात असल्यास, मदत पुरवली जाऊ शकते. मदतीसाठी, तुम्ही सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या 1800-599-0019 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.

Web Title: Meta ai saves the life of a girl who set out to end her life an alert was given to the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 10:36 AM

Topics:  

  • Meta AI

संबंधित बातम्या

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर
1

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

Mark Zuckerberg ने दिलं अनोखं गिफ्ट! हिंदी भाषा जाणणाऱ्यांना प्रति तास देणार 5 हजार रुपये, करावं लागणार हे काम
2

Mark Zuckerberg ने दिलं अनोखं गिफ्ट! हिंदी भाषा जाणणाऱ्यांना प्रति तास देणार 5 हजार रुपये, करावं लागणार हे काम

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा
3

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.