Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta आणि OpenAI भारताच्या ‘या’ कंपनीसोबत करणार हातमिळवणी! नवीन AI पार्टनरशिप युजर्ससाठी ठरणार फायदेशीर की वाढवणार टेंशन?

भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ऑफरचा विस्तार करण्यासाठी OpenAI आणि Meta भारतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्ससोबत चर्चा करत आहेत. याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2025 | 07:45 PM
Meta आणि OpenAI भारताच्या 'या' कंपनीसोबत करणार हातमिळवणी! नवीन AI पार्टनरशिप युजर्ससाठी ठरणार फायदेशीर की वाढवणार टेंशन?

Meta आणि OpenAI भारताच्या 'या' कंपनीसोबत करणार हातमिळवणी! नवीन AI पार्टनरशिप युजर्ससाठी ठरणार फायदेशीर की वाढवणार टेंशन?

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीसोबत भागिदारी करण्यासाठी दोन मोठ्या परदेशी कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. या कंपन्या म्हणजे Meta आणि OpenAI. होय, अमेरिकेच्या दिग्गज कंपन्या Meta आणि OpenAI रिलायन्स इंडस्ट्रीसोबत भागिदारी करणार आहेत. यासाठी त्यांनी एक ऑफर देखील आणली आहे, या ऑफरबाबत सध्या चर्चा केली जात आहे. ही भागिदारी भारतातील युजर्ससाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. भारतात AI चा विस्तार करण्यासाठी ही भागिदारी केली जाणार असल्याचं, सांगितलं जात आहे.

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओ आणि OpenAI यांच्यात भागीदारीबाबत चर्चा करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे आणि OpenAI ही AI चॅटबॉट चॅटजीपीटी तयार करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आता या दोन्ही दिग्गज कंपन्यांमधील भागिदारीबाबत चर्चा सुरु झाली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

OpenAI चे सबस्क्रिप्शन प्लॅन अधिक स्वस्त होण्याची शक्यता

अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की OpenAI ने त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चॅटजीपीटीचे सबस्क्रिप्शन प्लॅन स्वस्त करण्याबाबत चर्चा केली आहे. तथापि, कंपनीने रिलायन्सशी झालेल्या चर्चेदरम्यान याबाबत भाष्य केलं असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. रिलायन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी OpenAI चे मॉडेल्स त्यांच्या एंटरप्राइझ ग्राहकांना एपीआयद्वारे विकण्यावर चर्चा केली होती. याशिवाय, रिलायन्सने भारतात OpenAI मॉडेल्स होस्ट करण्याची आणि चालवण्याची ऑफर देखील दिली आहे जेणेकरून स्थानिक युजर्सचा डेटा भारतातच साठवता येईल आणि हा डेटा अधिक सुरक्षित राहू शकतो. मात्र ही भागिदारी कधी केली जाणार आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे, याबाबत अद्याप दोन्ही कंपन्यांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही.

मेटा सोबत अशीच चर्चा

OpenAI व्यतिरिक्त, रिलायन्सने जामनगरमधील कंपनीच्या आगामी डेटा सेंटरमधून त्यांचे AI मॉडेल्स चालविण्यासाठी मेटाशी देखील चर्चा केली आहे. रिलायन्स गुजरातमधील जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे AI डेटा सेंटर बांधणार आहे. या केंद्राची एकूण क्षमता 3 गिगावॅट असेल आणि जगात त्याची कोणतीही स्पर्धा नसेल. सध्या, बहुतेक कार्यरत डेटा सेंटर्स अमेरिकेत आहेत आणि त्यापैकी बहुतेकांची क्षमता एक गिगावॅटपेक्षा कमी आहे. मात्र आता भारतात तयार केल्या जाणाऱ्या या केंद्रांची क्षमता जास्त असणार आहे. या प्रकल्पासाठी रिलायन्सने NVIDIA सोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये वापरलेला AI सेमीकंडक्टर NVIDIA कडून घेतला जाईल. मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत परिपत्रक जारी केलं नाही.

डेटा सेंटर हरित ऊर्जेवर चालेल

डेटा सेंटर चालविण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेक तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जर आपण गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या डेटा सेंटरबद्दल बोललो तर त्याच्या बहुतेक गरजा हरित ऊर्जेद्वारे पूर्ण केल्या जातील. रिलायन्स या क्षेत्रात सौरऊर्जा, पवनचक्क्या आणि हरित हायड्रोजन प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे.

Web Title: Meta and openai will partnership with reliance industries soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • meta
  • Mukesh Ambani
  • openai

संबंधित बातम्या

2025 मधील Top 10 भारतीय कौटुंबिक व्यवसायात ठरले भारी, संपत्ती भारताच्या GDP ला टाकेल मागे; संपत्ती वाचून व्हाल अवाक्
1

2025 मधील Top 10 भारतीय कौटुंबिक व्यवसायात ठरले भारी, संपत्ती भारताच्या GDP ला टाकेल मागे; संपत्ती वाचून व्हाल अवाक्

Mukesh Ambani : अमेरिकेत असीम मुनीर यांचे धाडस, मुकेश अंबानीचा फोटो दाखवून भारताला अणुहल्ल्याची धमकी
2

Mukesh Ambani : अमेरिकेत असीम मुनीर यांचे धाडस, मुकेश अंबानीचा फोटो दाखवून भारताला अणुहल्ल्याची धमकी

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात
3

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात

भारत लवकरच अमेरिकेला टाकणार मागे! ChatGPT-5 च्या लाँचिंगवेळी सॅम अल्टमॅनने सांगितलं असं काही… सर्वांचेच उडाले होश
4

भारत लवकरच अमेरिकेला टाकणार मागे! ChatGPT-5 च्या लाँचिंगवेळी सॅम अल्टमॅनने सांगितलं असं काही… सर्वांचेच उडाले होश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.