BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL मुळे खाजगी टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel चं टेंशन वाढलं आहे. BSNL च्या परवडणाऱ्या आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅनमुळे Jio आणि Airtel युजर्सची संख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. BSNL त्यांच्या युजर्सना परडवणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते, यामध्ये काही शंकाच नाही. हे रिचार्ज प्लॅन त्यांच्या ग्राहकांना टू ईन वन फायदे देतात. म्हणजेच इतर कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनसोबत तुलना करता या रिचार्ज प्लॅनची किंमत प्रचंड कमी आहे. शिवाय BSNL चे हे रिचार्ज प्लॅन कमी किंमतीत जास्त फायदे देखील ऑफर करतात.
BSNL च्या लिस्टमध्ये असे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे तुम्हाला दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करतात. म्हणजेच एकदा रिचार्ज केली, की वर्षभर चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक तीन महिन्याला तारीख लक्षात ठेऊन रिचार्ज करणं म्हणजे फार कटकट आहे. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक आहात का, ज्याला सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला BSNL च्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करतो. BSNL च्या या प्लॅनने Jio आणि Airtel ची झोप उडवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL कंपनी परवडणाऱ्या किमतीत एक उत्तम रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि 600 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच, जर तुम्ही आज रिचार्ज केले तर मार्च 2026 पर्यंत व्हॅलिडिटी, कॉलिंग, एसएमएस आणि डेटाबद्दल तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
BSNL चा हा प्लॅन तुम्हाला मासिक रिचार्जच्या त्रासातून मुक्त करू शकतो. 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण 600GB डेटा दिला जात आहे. भारतात प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा वापर 27.5GB आहे. अशा परिस्थितीत, BSNL चा हा प्लॅन इतर छोट्या रिचार्ज प्लॅनपेक्षा जवळजवळ दुप्पट डेटा देत आहे. याशिवाय, व्हॅलिडिटी कालावधीत या योजनेत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. या योजनेसाठी युजर्सना 1,999 रुपये द्यावे लागतील.
UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी
जर तुम्ही कमी व्हॅलिडीटी असलेला प्लॅन शोधत असाल तर BSNL 599 रुपयांचा एक उत्तम प्लॅन देत आहे. 84 दिवसांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, 40 केबीपीएस वेगाने डेटा अॅक्सेस करता येईल. याशिवाय, या योजनेत देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे पाहिले तर, सुमारे 7 रुपयांच्या डेली किमतीत, हा प्लॅन डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, व्हॅलिडीटी आणि एसएमएसचे फायदे देत आहे. जर आपण त्याची तुलना जिओच्या डेली 3GB डेटा प्लॅनशी केली तर त्याची किंमत 1199 रुपये आहे.