Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta ने लाँच केलं अ‍ॅडवांस्ड स्मार्ट ग्लास Orion, होलोग्राफिक लेन्सने खरं दिसेल वर्चुअल जग

Meta सीईओ मार्क झुकरबर्गने अ‍ॅडवांस्ड स्मार्ट ग्लास Orion लाँच केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात प्रगत चष्मा आहे. या चष्म्याच्या मदतीने तुम्हाला वर्चुअल आणि आभासी जग देखील अगदी खरं भासणार आहे. Orion हा जगातील आतापर्यंतचा सर्वात प्रगत स्मार्ट ग्लास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एका ईव्हेंटमध्ये कंपनीने हा चष्मा लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 26, 2024 | 08:55 AM
Meta ने लाँच केलं अ‍ॅडवांस्ड स्मार्ट ग्लास Orion, होलोग्राफिक लेन्सने खरं दिसेल वर्चुअल जग

Meta ने लाँच केलं अ‍ॅडवांस्ड स्मार्ट ग्लास Orion, होलोग्राफिक लेन्सने खरं दिसेल वर्चुअल जग

Follow Us
Close
Follow Us:

मोठी टेक कंपनी Meta ने मेगा इव्हेंट Meta Connect 2024 चे आयोजन केले होते. या ईव्हेंटमध्ये Meta सीईओ मार्क झुकरबर्गने एक मोठी घोषणा केली आहे. ईव्हेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वात प्रगत चष्मा लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या ईव्हेंटमध्ये अ‍ॅडवांस्ड स्मार्ट ग्लास Orion लाँच केला आहे. Orion हा जगातील आतापर्यंतचा सर्वात प्रगत स्मार्ट ग्लास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Orion मध्ये होलोग्राफिक लेन्स देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने आभासी आणि वर्चुअल जग तुम्हाला अगदी खऱ्या सारखं भासणार आहे.

हेदेखील वाचा- Airtel ने ग्राहकांना दिली एक खास भेट, लाँच केलं पहिले AI आधारित स्पॅम कॉल-मेसेज डिटेक्शन टूल

Orion चे फीचर्स तुम्हाला आश्चर्यकारक करणारे असणार आहेत. Meta Connect 2024 दरम्यान, मार्क झुकरबर्गने Orion स्मार्ट ग्लासेसचा डेमो दिला आणि या ग्लासेसचे फीचर्स ऐकूण सर्वच लोकं आश्चर्यचकित झाले. Orion हा एक स्वतंत्र स्मार्ट ग्लास आहे. याला कोणत्याही तारा जोडलेल्या नाहीत आणि त्याचे वजन 100gm पेक्षा कमी आहे. Orion सामान्य चष्मासारखा दिसतो आणि त्यात होलोग्राफिक डिस्प्ले आहे. पण त्याचे फीचर्स सामान्य चष्म्यासारखे नाहीत. प्रथमच, कंपनीने पूर्ण होलोग्राफिक ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) चष्मा लाँच केला आहे. (फोटो सौजन्य – X अकाऊंट)

Here’s a sneak peek at Meta’s new small form glasses, called Orion. They’re fully standalone and feature eye, hand, and even neural tracking. Can’t wait to try these! pic.twitter.com/gIN2NOllMW

— Nathie @ Meta Connect (@NathieVR) September 25, 2024

Orion ग्लासमध्ये एक खास डिस्प्ले आहे, असे मार्क झुकरबर्गने म्हटले आहे. त्यात छोटे प्रोजेक्टर देण्यात आले आहेत. यासाठी नॅनोस्केल घटक आणि कस्टम सिलिकॉन असलेल्या सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. Orion चष्मा आवाजाद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इंटिग्रेशन देण्यात आले असून न्यूरल इंटरफेस देण्यात आला आहे.

Quest 3S is shipping October 15 for just $300. Expecting this to sell really well! pic.twitter.com/wZ0CcfKFGC

— Nathie @ Meta Connect (@NathieVR) September 25, 2024

हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

Meta Connect 2024 ईव्हेंटची सुरुवात सीईओ मार्क झुकरबर्गने केली. या ईव्हेंटमध्ये मार्क झुकरबर्गने काही नवीन डिव्हाईस लाँच केले. या ईव्हेंटमध्ये Meta Quest 3 आणि Meta Quest 3s VR हेडसेटसह Orion स्मार्ट ग्लासेस लाँच करण्यात आले. सर्वात प्रगत स्मार्ट चष्मा Orion स्मार्ट ग्लासेस असं म्हणत मार्क झुकेरबर्गने Orion ची ओळख करून दिली. हे एआर चष्मे अद्याप प्रोटोटाइपच्या टप्प्यात असले तरी त्यात दिलेली वैशिष्ट्ये निश्चितच आश्चर्यकारक आहेत. कंपनीने याचे वर्णन जगातील सर्वात प्रगत स्मार्ट ग्लास म्हणून केले आहे. Orion नेहमीच्या चष्म्यासारखे दिसते, परंतु त्यात होलोग्राफिक डिस्प्ले समाविष्ट आहे.

मेटा क्वेस्ट 3 आणि मेटा क्वेस्ट 3s उत्तम कामगिरी करणार आहेत. कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट सपोर्ट दिला आहे, यासोबतच ते उच्च रिझोल्यूशन डिस्प्ले आणि पॅनकेक सारख्या वैशिष्ट्यांसह डिझाइन केले आहेत. यात पुन्हा डिझाइन केलेले टच प्लस कंट्रोलर वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे. मेटा क्वेस्ट सपोर्ट सध्या उपलब्ध असलेल्या सर्व देशांमध्ये कंपनी Quest 3 लाँच करेल. भारतात या डिव्हाइसची किंमत 25 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

मेटाचे नवीनतम क्वेस्ट हेडसेट व्हर्च्युअल तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कंपनीने त्यांना अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज केले आहे. मार्क झुकरबर्गच्या म्हणण्यानुसार, ही एक ऑल-इन-वन प्रणाली आहे, ज्यामध्ये वापरकर्ते एकाच वेळी अनेक प्रकारची कामे करू शकतात. एकाच वेळी मल्टीप्लेअर गेम खेळणे आणि थेट शो पाहणे देखील शक्य आहे.

Web Title: Meta launch advanced smart glass orion with holographic lens you can experience virtual world in real

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 08:55 AM

Topics:  

  • Mark Zuckerberg

संबंधित बातम्या

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
1

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?
2

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही
3

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या
4

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.