Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola Signature Launch: अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवा Criteria!

मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील मोटोरोला कंपनीने भारतात अल्ट्रा-प्रीमियम Motorola Signature स्मार्टफोन लाँच केला आहे. लक्झरी डिझाइन, DXOMARK गोल्ड लेबल कॅमेरा आणि प्रगत एआय फीचर्स हे या फोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 23, 2026 | 04:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी मोटोरोला कंपनीने भारतात आपला अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन Motorola Signature लाँच केला आहे. लक्झरी डिझाइन, जागतिक दर्जाचा कॅमेरा, अत्याधुनिक एआय फीचर्स आणि खास ‘Signature Club’ प्रिव्हिलेजेससह हा स्मार्टफोन भारतीय प्रीमियम सेगमेंटमध्ये नवे मापदंड निर्माण करणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची प्रभावी लाँच किंमत ५४,९९९ रुपयांपासून सुरू होते.

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Motorola Signature मध्ये DXOMARK गोल्ड लेबल प्रमाणित जगातील सर्वोत्तम कॅमेरा देण्यात आला आहे. DXOMARK कॅमेरा इंडेक्समध्ये १६४ स्कोअर मिळवत, १ लाख रुपयांखालील श्रेणीत हा भारतातील नंबर वन कॅमेरा फोन ठरला आहे. या फोनमध्ये जगातील पहिला व सर्वात प्रगत Sony LYTIA B2B 50MP मेन कॅमेरा देण्यात आला असून, 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग, Dolby Vision सपोर्ट, प्रगत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि Pantone प्रमाणित रंग अचूकता मिळते. यासोबत 50MP पेरिस्कोप कॅमेरा (3x ऑप्टिकल व 100x सुपर झूम), 50MP अल्ट्रा-वाइड + मॅक्रो कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

डिझाइनच्या बाबतीत Motorola Signature अतिशय सडपातळ आणि लक्झरी अनुभव देतो. केवळ 6.99 मिमी जाडी असलेल्या या फोनमध्ये एअरक्राफ्ट-ग्रेड अ‍ॅल्युमिनियम फ्रेम आणि फॅब्रिक-प्रेरित प्रीमियम फिनिश देण्यात आली आहे. Pantone Martini Olive आणि Pantone Carbon या आकर्षक रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसरवर चालतो, जो उच्च दर्जाची गेमिंग, मल्टीटास्किंग आणि एआय-आधारित कामगिरी देतो. प्रगत कूलिंग सिस्टीममुळे दीर्घकाळ सर्वोच्च कार्यक्षमता टिकून राहते. 12GB व 16GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. 6.8 इंचाचा Super HD AMOLED डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision आणि HDR10+ सपोर्ट हा फोन अधिक आकर्षक बनवतो.

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?

Motorola Signature सोबत भारतातील पहिल्यांदाच Signature Club Privileges देण्यात आले आहेत. यामध्ये 24×7 लाईव्ह एजंट सपोर्ट, प्रीमियम लाइफस्टाइल सेवा, प्रवास, वेलनेस आणि वैयक्तिक सहाय्याचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने Polar द्वारे समर्थित Moto Watch देखील लाँच केली असून, ती प्रगत वेलनेस ट्रॅकिंग, OLED डिस्प्ले आणि दीर्घ बॅटरी बॅकअपसह येते. Motorola Signature ची विक्री ३० जानेवारी २०२६ पासून Flipkart, Motorola.in आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे. प्रीमियम फीचर्स, लक्झरी डिझाइन आणि खास सेवांसह Motorola Signature भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठा प्रभाव पाडण्याची शक्यता आहे.

Web Title: Motorola signature launch a new benchmark in the ultra premium smartphone segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • mobile
  • motorola

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत
1

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.