फोटो सौजन्य - pinterest
लोकप्रिय टेक कंपनी Motorola लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन जगातील सर्वात स्लिम फोन असणार आहे. कंपनीने या नव्या स्मार्टफोनचा टीझर देखील जरी केला आहे. कंपनीने ने सांगितलं आहे की, Motorola आणि MIL-810 लवकरच जगातील सर्वात स्लिम फोन लाँच करणार आहेत. हा फोन अतिशय बोल्ड असेल, असं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने अद्याप या फोनच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र कंपनीने X वर जारी केलेल्या टिझर नुसार, Motorola चा फोन जगातील सर्वात स्लिम फोन असणार आहे.
हेदेखील वाचा- Microsoft युजर्सवर पुन्हा एकदा CrowdStrike अटॅक होण्याची शक्यता; कंपनीकडून अलर्ट जारी
कंपनीने X वर जारी केलेल्या टिझर मध्ये तुम्ही या फोनचा लूक पाहू शकता. मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. कंपनीच्या इतर प्रॉडक्ट्स प्रमाणे ह्या नव्या फोनमध्ये देखील भन्नाट फिचर्स मिळणार यामध्ये काहीच शंका नाही. चला तर मग पाहूया या नव्या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत.
Motorola च्या या नव्या स्मार्टफोनचे नाव Motorola Edge 50 Neo असू शकते. हा फोन 2 व्हेरिएंटमध्ये मध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 8GB + 256GB स्टोरेज आणि 12GB + 512GB हे व्हेरिएंट असू शकतात. हा नवा स्लिम फोन राखाडी, निळा, पोइन्सियाना आणि मिल्क कलरसह 4 रंगांच्या शेड्समध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. Motorola चा हा नवीन स्लिम फोन प्रीमियम लूकसह लाँच केला जाईल, ज्यामुळे युजर्सना हा स्लिम फोन वापरताना एक भन्नाट अनुभव मिळू शकेल.
हेदेखील वाचा- Apple लाँच करणार पहिला फोल्डेबल iPhone! फोल्डेबल मॅकबुक देखील लाँच होण्याची शक्यता
Motorola Edge 50 Neo अनेक उत्तम फिचर्ससह लाँच केला जाणार आहे. Motorola Edge 50 Neo मध्ये Android 14 दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, Edge 50 Neo मध्ये फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, Motorola चा Edge 50 Neo फोन Pantone प्रमाणित असणार आहे. याचा अर्थ असा की हा फोन वापरून वापरकर्त्यांना एक अद्भुत दृश्य अनुभव मिळेल.
Motorola Edge 50 Neo ची किंमत 29 हजार 999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. मात्र कंपनीने अद्याप या फोनची अधिकृत किंमत सांगितली नाही. Motorola Edge 40 Neoच्या तुलनेत, कंपनी Motorola Edge 50 Neo ला मोठ्या अपग्रेडसह जगासमोर सादर करेल. Motorola Edge 40 Neo प्रमाणे Motorola Edge 50 Neo ला देखील लोकांची जबरदस्त पसंती मिळू शकते. Motorola Edge 40 Neo ला लोकांनी प्रचंड पसंती दर्शवली आहे. Motorola Edge 40 Neo अनेक जबरदस्त फीचर्ससह लाँच करण्यात आला होता. त्याप्रमाणे Motorola Edge 50 Neo देखील एक जबरदस्त लाँचिंग असणार आहे.