फोटो सौजन्य - pinterest
लोकप्रिय आणि जगप्रसिध्द टेक कंपनी Apple लवकरच त्यांचा पहिला फोल्डेबल iPhone लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. जगभरात फोल्डेबल फोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक टेक कंपन्या त्यांचे फोल्डेबल फोन लाँच करत आहेत. Motorola, Huawei, Honor आणि Samsung या टेक कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. युजर्सची देखील फोल्डेबल फोनला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आता लोकप्रिय कंपनी Apple देखील फोल्डेबल फोनच्या शर्यतीत उतरली आहे. Apple लवकरच फोल्डेबल iPhone लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. iPhone सोबत Apple फोल्डेबल मॅकबुक देखील करू शकतं.
हेदेखील वाचा – Apple लवकरच लाँच करणार अतिशय स्वस्त iPhone! AI सह सर्व लेटेस्ट फीचर्सचा असणार समावेश
Apple 2026 मध्ये फोल्डेबल iPhone लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फोल्डेबल iPhone विषयी चर्चा सुरु आहे. Apple युजर्स या नव्या iPhone ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. Apple च्या फोल्डेबल iPhone चे काम काही टप्प्यांत पूर्ण झालं आहे. याशिवाय फोल्डेबल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्ससाठी कंपनीने आशियातील पुरवठादारांशीही संपर्क साधला आहे. कंपनीने या उत्पादनासाठी V68 नावाचा अंतर्गत कोड देखील तयार केला आहे. Apple जेव्हा फोल्डेबल फोन लाँच करेल तेव्हा त्या फोनची स्पर्धा थेट Motorola, Huawei, Honor आणि Samsung या कंपन्यांच्या फोल्डेबल फोनसोबत असणार आहे. Apple लोकप्रिय टेक कंपनी आहे. त्यामुळे कंपनीने फोल्डेबल iPhone लाँच करावा अशी युजर्सची गेल्या अनेत वर्षांपासून मागणी होती. आता ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
हेदेखील वाचा – Apple चा Iphone युजर्सना इशारा; Pegasus स्पायवेअरचा हल्ला होण्याची शक्यता
Apple क्लॅमशेल स्टाईल फ्लिप फोन लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. अहवालात म्हटले आहे की, कंपनी गेल्या महिन्यापासून दोन फोल्डिंग आयफोन प्रोटोटाइप विकसित करत आहे. Apple ने फोल्डेबल फोनसाठी डिझाइन तयार केलं आहे. Apple कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरवर भर देऊन फ्लिप स्टाइल फोल्डेबल फोन आणू शकते. तर कंपनी 20.3-इंच फोल्डेबल मॅकबुकवर देखील काम करत असल्याचं समोर आलं आहे. Apple हे फोल्डेबल मॅकबुक 2027 पर्यंत लाँच करू शकते.
Samsung ने 2019 मध्ये फोल्डेबल सेगमेंटमध्ये पहिला फोन लाँच केला होता. तेव्हापासून फोल्डेबल आणि फ्लिप फोन्सचा ट्रेंड झपाट्याने वाढू लागला आहे. Samsung ने जुलैच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 2024 मध्ये AI वैशिष्ट्यांसह Galaxy Z Fold आणि Z Flip सादर केले होते. Samsung च्या या दोन्ही फोनला अतिशय प्रिमियम लुक देण्यात आला आहे. Samsung च्या Galaxy Z Fold आणि Z Flip च्या लाँचिंगनंतर चीनी मोबाईल कंपन्या Honor आणि Huawei ने देखील या सेगमेंटमध्ये फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. फोल्डेबल फोन शर्यतीत Huawei ने सॅमसंगला मागे टाकून प्रथमच अव्वल स्थान पटकावले आहे.