Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone बाबत मोठा खुलासा! किंमत आणि फीचर्स आले समोर, या महिन्यात लाँच होण्याची शक्यता
येत्या सप्टेंबर महिन्यात टेक कंपनी Apple त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. आगामी सिरीज कधी लाँच होणार, त्यामध्ये कोणते फीचर्स असणार, कोणत्या आयफोन मॉडेलचा समावेश असणार याबाबत युजर्सच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. असं सांगितलं जात आहे की येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज लाँच केली जाणार आहे. आयफोनच्या आगामी सिरिजबाबत चर्चा सुरू असतानाच आता एक नवा खुलासा करण्यात आला आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, Apple त्यांचा पहिला फोल्डेबल फोन लवकर लाँच करू शकतो. गेल्या काही दिवसात फोल्डेबल फोनबाबत अनेक अपडेट समोर आले आहेत. या फोनचे फीचर्स कसे असतील, त्यामध्ये कोणते अपडेट्स दिले जाणार आहेत, त्याची किंमत किती असणार आहे आणि फोनची लाँच डेट काय असणार आहे, याबाबत माहिती मिळाली आहे. कंपनीने अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी सोशल मीडियावर सतत लिक्स व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, पहिला Apple iPhone Fold हा 2026 च्या दुसऱ्या सहामाहित लाँच होण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस दरवर्षीप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या 2026 च्या सप्टेंबर ईव्हेंटमध्ये लाँच केले जाऊ शकते. 2026 मध्ये कंपनीची iPhone 18 सिरीज लाँच केली जाऊ शकते आणि या सिरीजसोबतच पहिला Apple iPhone Fold लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या एका रिपोर्टमध्ये आयफोनच्या किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये Apple iPhone Fold ची किंमत 2,000 डॉलरहून अधिक असू शकते. तथापि, भारतीय बाजारात Apple iPhone Fold ची किंमत सुमारे 1 लाख 75 हजार रुपये असू शकते. तथापि, काही अहवालांमध्ये असेही म्हटले जात आहे की भारतीय बाजारात Apple iPhone Fold ची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे हा देखील कंपनीचा महागडा फोन असणार आहे.
Apple iPhone Fold शी संबंधित अनेक अहवाल आणि पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. अलिकडच्या एका अहवालात असे सूचित केले आहे की यात Apple iPhone Fold मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असू शकते. Wccftech च्या अहवालानुसार, हा फोल्डेबल फोन 5000 ते 5500mAh बॅटरीसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. Apple iPhone Fold मध्ये कंपनी मोठी बॅटरी देऊ शकते. इतर फ्लॅगशिप आयफोन्सप्रमाणे, या फोल्डेबल डिव्हाइसमध्ये देखील OLED डिस्प्ले असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डिव्हाइसचा आऊटर डिस्प्ले सुमारे 5.5 इंच आणि इनर डिस्प्ले 7.7 इंच असू शकतो. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की, यावेळी Apple कोणताही नवीन इनोव्हेशन आणत नाहीये. त्याऐवजी, कंपनी फोल्डेबलला प्रीमियम लूक देण्याचा प्रयत्न करू शकते.