Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI फिचर्ससह Noise चे ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच लाँच! काय आहे किंमत? जाणून घ्या.

तुम्ही सुद्धा स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लोकप्रिय कंपनी Noise नेअसाच एक उत्कृष्ट फिचर्स असणारा स्मार्टवॉच लाँच केला आहे. Noise ने ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच लाँच केलं आहे. Noise ने हे स्मार्टवॉच मॅक्स व्हर्जन म्हणून सादर केले आहे. ColorFit Pulse 4 Max मध्ये पहिल्या स्मार्टवॉचपेक्षा मोठा डिस्प्ले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2024 | 10:28 AM
फोटो सौजन्य - Noise

फोटो सौजन्य - Noise

Follow Us
Close
Follow Us:

वेगवेगळ्या टेक कंपन्या त्यांचे स्मार्टवॉच लाँच करत आहेत. प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये त्या कंपनीचे विशेष फिचर्स देण्यात आले असतात. आधीच्या स्मार्टवॉचमध्ये नवीन बदल करून कंपन्या नवे स्मार्टवॉच लाँच करतात. त्यामुळे आपण स्मार्टवॉच खरेदी करताना गोंधळतो. कोणता स्मार्टवॉच चांगले फिचर्स देईल याबाबत आपल्याला नेहमी शंका असते. तुम्ही सुद्धा स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

लोकप्रिय कंपनी Noise नेअसाच एक उत्कृष्ट फिचर्स असणारा स्मार्टवॉच लाँच केला आहे. Noise ने ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच लाँच केलं आहे. हे स्मार्टवॉच AI फिचर्ससह लाँच करण्यात आले आहे. Noise ने हे स्मार्टवॉच मॅक्स व्हर्जन म्हणून सादर केले आहे. ColorFit Pulse 4 Max मध्ये पहिल्या स्मार्टवॉचपेक्षा मोठा डिस्प्ले आहे. ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच AI Create फिचर्स ने सुसज्ज आहे. चला तर मग पाहूया ColorFit Pulse 4 Max चे फिचर्स आणि किंमत.

हेदेखील वाचा- 1826 मध्ये काढण्यात आला होता जगातील पहिला फोटो! जाणून घ्या सविस्तर

ColorFit Pulse 4 Max चे फिचर्स

ColorFit Pulse 4 Max मध्ये पहिल्या स्मार्टवॉचपेक्षा मोठा डिस्प्ले आहे. AI आधारित या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट, IP68 रेटिंग, 7 दिवसांपर्यंतची बॅटरी आणि इतर अनेक स्पेसिफिकेशन्स देण्यात आली आहेत.

ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉचची किंमत

ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच 2,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हे 299 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकतात. हे स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ई कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. हे Calm Silver Link, Blue आणि Black Link कलर पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉचचा डिस्प्ले

या स्मार्टवॉचमध्ये 1.96-इंचाचा AMOLED स्क्वॅरिश ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे, जो ColorFit Pulse 4 वरील 1.85-इंचाच्या डिस्प्लेपेक्षा मोठा आहे. यात फंक्शनल क्राउन आणि 100 पेक्षा जास्त वॉच फेस देखील आहेत.

हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट

कनेक्टिवहिटी

स्मार्टवॉच TruSync फिचर्स आणि ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहे, जे उत्तम ब्लूटूथ कॉलिंगला परवानगी देते. याशिवाय, हे वापरकर्त्यांना 10 पर्यंत संपर्क सेव्ह करण्याची आणि अलीकडील कॉल्समध्ये ॲक्सेस करण्याची परवानगी देते.

AI फिचर्स

ColorFit Pulse 4 Max स्मार्टवॉच युजर्सना AI-आधारित वॉच फेस तयार करण्यास परवानगी देते. यामधे AI फिचर आहे. हे घड्याळ वापरकर्त्यांना एआय क्रिएटद्वारे AI-आधारित घड्याळाचे चेहरे तयार करण्यास अनुमती देते. यात एआय शोध वैशिष्ट्य देखील आहे, जे युजर्सना स्मार्टवॉचच्या डिस्प्लेला स्पर्श न करता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात शोधण्यासाठी मदत करतात. या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सचाही समावेश आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, SpO2 (ब्लड ऑक्सिजन) आणि नॉइज हेल्थ सूटच्या मदतीने बरेच काही करता येते. यात 100+ स्पोर्ट मोड आहेत.

Web Title: Noises colorfit pulse 4 max smartwatch launched with ai features what is the price find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 10:28 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.