फोटो सौजन्य - सोशल मिडीया
मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि संगणक काल 19 जुलै रोजी ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होतो. MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप काम कराताना अचानक क्रॅश झाले. त्यामुळे युजर्सना त्यांच्या लॅपटॉपवर एक निळी स्क्रिन दिसत होती. यामध्ये सांगितलं होतं की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रोसेसला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ(बीएसओडी) असं नाव देण्यात आलं होतं. अनेक युजर्सनी या निळ्या स्क्रीनचे फोटो त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले. एवढेच नाही तर मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम विमानसेवेवर देखील झाला. इंडिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
हेदेखील वाचा-इअरबड्समध्ये पाणी गेलंय का? ‘या’ ट्रीकचा वापर करून घरीच तुमचे इअरबड्स दुरुस्त करा
आकासा, स्पाइसजेट या विमान कंपन्यांनी देखील लोकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सर्व्हरच्या बिघाडामुळे मोठ्या संख्येने प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. सर्व्हरच्या बिघाडामुळे बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. बँकेशी संबंधित कामासाठी गेलेल्या लोकांना सर्व्हरमधील बिघाडामुळे पुन्हा परतावे लागले. सर्व्हरमधील बिघाडामुळे स्काय न्यूज चॅनल ब्रिटनमध्ये बंद झाले होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम अनेक महत्त्वाच्या कामांवर झाला. या सर्व प्रकरणावर आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सत्या नडेला यांनी त्यांच्या X अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Yesterday, CrowdStrike released an update that began impacting IT systems globally. We are aware of this issue and are working closely with CrowdStrike and across the industry to provide customers technical guidance and support to safely bring their systems back online.
— Satya Nadella (@satyanadella) July 19, 2024
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काल, CrowdStrike ने एक अपडेट जारी केलं ज्याने जागतिक स्तरावर IT प्रणालींवर परिणाम करण्यास सुरुवात केली. आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि युजर्सना त्यांची सिस्टम सुरक्षितपणे परत ऑनलाइन आणण्यासाठी आम्ही CrowdStrike आणि संपूर्ण टीमसोबत काम करत आहोत.
हेदेखील वाचा- Tata Play Binge ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन! युजर्सना मिळणार अनलिमिटेड फायदे
CrowdStrike अपडेटमुळे युजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ समस्येला सामोरे जावं लागलं, असं मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. या बगमुळे लोकांच्या पर्सनल कॉम्प्युटरसोबतच जगभरातील कंपन्या, बँका, सरकारी कार्यालये आणि विमान कंपन्यांनाही याचा फटका बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी ही समस्या सतत शेअर केली. जर तुमच्याही पर्सनल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ समस्या निर्माण झाली असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना जारी होण्याची प्रतीक्षा करा. CrowdStrike सध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट मिळेल.
मायक्रोसॉफ्ट डाऊनबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक निवदेन जारी केलं होतं. या निवेदनात म्हटलं होतं की, जागतिक आउटेजबाबत मंत्रालय मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या भागीदारांच्या संपर्कात आहे. या आउटेजचे निराकरण करण्यासाठी अद्यतने जारी केली गेली आहेत. एक तांत्रिक सल्ला जारी केला आहे. या आउटेजमुळे NIC नेटवर्कवर कोणताही परिणाम झालेला नाही.