
स्टायलिश लुक + पॉवरफुल फीचर्स! Nothing Phone 3a स्पेशल एडिशन भारतात लाँच, कस्टम हार्डवेयर डिझाईनने सुसज्ज; जाणून घ्या किंमत
भारतात Nothing Phone 3a Community Edition चे 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजवाले व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये असणार आहे. कंपनी या स्पेशल एडीशन हँडसेटचे केवळ 1 हजार युनिट्स बनवणार आहे, जे लिमिटेड रिलीजचा भाग म्हणून सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल. भारतात, Nothing Phone 3a Community Edition स्मार्टफोन 13 डिसेंबर रोजी बंगळुरुमध्ये एका खास स्पेशल ड्रॉप ईव्हेंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
The future like you remember it. Phone (3a) Community Edition 2025 is here. Thank you to Emre, Jad, Louis, Ambrogio, and Sushruta for their creativity and collaborative spirit in making it happen. pic.twitter.com/yRCBPpcbIj — Nothing (@nothing) December 9, 2025
Nothing Phone 3a Community Edition मध्ये स्टँडर्ड मॉडेलसारखे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या स्पेशल एडीशन स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर, 6.7-इंच फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Nothing Community Edition प्रोजेक्टच्या स्टेज 1 मध्ये डिझाईन प्रोसेस समाविष्ट होती.
कम्युनिटी मेंबर एमरे कायगनकलकडे विनिंग हार्डवेयर पॅकेड आणि डिझाईन होते, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील टेक्नोलॉजीच्या एस्थेटिक्सने प्रेरित आहे. Nothing च्या लेटेस्ट Community Edition प्रोजेक्टमध्ये नवीन कॅटेगरी देखील समाविष्ट होती, ज्याला एक्सेसरी डिझाईन म्हटलं जात आहे. डाइसच्या प्रत्येत फोकसवर कंपनीचे सिग्नेचर Ndot 55 फॉन्टमध्ये नंबर दिले आहेत. कम्युनिटी मेंबर जॅड जॉकने Nothing च्या लंडन-बेस्ड सॉफ्टवेयर टीमसह नवीन लॉक स्क्रीन क्लॉक फेस आणि वॉलपेपर डिझाईन केला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, हे विजुअल क्लटर कमी करते.
Ans: Nothing ही Carl Pei यांनी स्थापन केलेली टेक कंपनी आहे, जी ट्रान्सपेरंट डिझाईन आणि यूनिक हार्डवेअर लुकसाठी प्रसिद्ध आहे.
Ans: Nothing ही Carl Pei यांनी स्थापन केलेली टेक कंपनी आहे, जी ट्रान्सपेरंट डिझाईन आणि यूनिक हार्डवेअर लुकसाठी प्रसिद्ध आहे.
Ans: याचे Glyph Interface, ट्रान्सपेरंट डिझाईन, स्वच्छ UI आणि प्रीमियम बिल्ड हे मुख्य आकर्षण आहेत.