OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या
OnePlus 15 मध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे, जो फ्लॅगशिप सेगमेंटचा बादशाह आहे. आगामी OnePlus 15R मध्ये Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर दिला जाणार आहे. यामध्ये ‘Elite’ वर्जन नसले तरी देखील हा गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अतिशय दमदार प्रोसेसर आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने पुष्टि केली आहे की, आगामी OnePlus 15R मध्ये 7,400mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे, जी फ्लॅग्शिप OnePlus 15 च्या बॅटरीपेक्षा मोठी आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर OnePlus 15 चांगला पर्याय ठरणार आहे. OnePlus 15 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे (50MP मुख्य + 50MP टेलीफोटो + 50MP अल्ट्रा-वाइड). OnePlus 15R मध्ये लीक्सनुसार ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे, ज्यामध्ये 50MP मेन + 8MP अल्ट्रा-वाइड यांचा समावेश असणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅडऐवजी वनप्लसचा नवीन DetailMax इंजन दिला जाणार आहे. OnePlus 15R मध्ये 4K व्हिडिओ 120fps वर रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
OnePlus 15R मध्ये 165Hz रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले दिला जाणार आहे. यामध्ये Quad IP रेटिंग्स (IP66, IP68, IP69, और IP69K) देण्यात आली आहे, ज्यामुळे डिव्हाईस पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. रिपोर्ट्समध्ये सांगितलं आहे की, आगामी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या OnePlus Ace 6T चा रीब्रँडेड वर्जन असू शकतो.
Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
OnePlus 15 भारतात 72,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर आगामी OnePlus 15R ची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते. जर तुम्हाला मोठी बॅटरी, उत्तम परफॉर्मंस आणि फ्लॅगशिपसारखी डिझाइन हवी असेल, तर 17 डिसेंबरपर्यंत OnePlus 15R ची वाट पाहणे शहाणपणाचे ठरेल. पण जर तुम्हाला सर्वोत्तम झूम कॅमेरा आणि टेलिफोटो लेन्स हवा असेल, तर OnePlus 15 तुमच्यासाठी आहे.
Ans: OnePlus भारतभर अधिकृत सर्व्हिस सेंटर्ससह येतो आणि 1–2 वर्षांची वॉरंटी देतो.
Ans: हो, बहुतेक मॉडेल्समध्ये Dual SIM स्लॉट उपलब्ध असतो, पण काही मॉडेल्समध्ये eSIM सपोर्ट देखील असतो.
Ans: अधिकृत OnePlus स्टोअर, Amazon India, Flipkart किंवा प्रीमियम रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.






