Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp सोबत फेसबूक अकाऊंट करू शकता लिंक, लवकरच येणार आहे नवं फीचर! युजर्स असा करू शकतात वापर

मेटाने पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फीचर सादर केलं आहे. हे फीचर फेसबूक आणि व्हाट्सअप अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आहे. हे नवीन फीचर नक्की आहे, त्याचा वापर कसा केला जाणार, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2025 | 12:09 PM
WhatsApp सोबत फेसबूक अकाऊंट करू शकता लिंक, लवकरच येणार आहे नवं फीचर! युजर्स असा करू शकतात वापर

WhatsApp सोबत फेसबूक अकाऊंट करू शकता लिंक, लवकरच येणार आहे नवं फीचर! युजर्स असा करू शकतात वापर

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपसाठी कंपनी सतत नवीन नवीन फीचर्स घेऊन येत असते. अलीकडेच कंपनीने व्हाट्सअप स्टेटस आणि व्हाट्सअप चॅटिंगसाठी अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत. या फीचर्समुळे व्हाट्सअप वापरण्याचा अनुभव अधिक चांगलं झाला आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या व्हाट्सअपसाठी इंस्टाग्रामसारखा एक नवा फीचर्स रोल आऊट केला होता. हे फीचर्स म्हणजे व्हाट्सअप वापरणाऱ्या युजर्ससाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या नव्या फीचर्समुळे युजर नंबरशिवाय देखील इतरांसोबत चॅटिंग करू शकणार आहेत. यानंतर आता कंपनीने आणखी एक नवीन फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर फेसबुक सोबत जोडलेले आहेत.

दिवाळीच्या घर सजावटीला द्या नवा तंत्रज्ञानाचा टच, AI निवडणार तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाइन आणि कलर कॉम्बिनेशन

कंपनीने सोशल मीडिया लिंकिंग ऑप्शन अधिक वाढवले आहेत. आता कंपनीने फेसबुक युजर्सना त्यांचे अकाउंट व्हाट्सअप प्रोफाइल पेजमध्ये ऍड करण्याचा नवीन ऑप्शन दिला आहे. आतापर्यंत युजर्स इंस्टाग्राम अकाउंट व्हाट्सअप प्रोफाइल पेजमध्ये ऍड करू शकत होते. आता युजर्स फेसबुक अकाउंट देखील त्यांच्या प्रोफाईल पेजमध्ये ऍड करू शकणार आहेत. त्यामुळे इतर युजर्स इंस्टाग्राम आणि फेसबूकवर जोडले जाणार आणि आयडेंटिटी व्हेरिफाय करणं अगदी सहज शक्य होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

व्हाट्सअपने हे नवीन फीचर त्यांच्या अँड्रॉइड बिटा युजरसाठी रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आणि अनेक युजरने या नवीन फीचरची पुष्टी देखील केली आहे. त्यामुळे सर्व युजर्सना लवकरच हे फीचर मिळणार आहे. आतापर्यंत व्हाट्सअप बिजनेस अकाउंटवर फक्त वेरिफाईड सोशल मीडिया लिंक्स दाखवल्या जात होत्या. परंतु नवीन फीचरमुळे इतर युजर्स देखील त्यांची सोशल मीडिया लिंक्स व्हाट्सअप प्रोफाइल पेजवर ऍड करू शकणार आहेत.

Free Fire Max: हे आहेत फ्री फायर मॅक्सचे टॉप 3 ईव्हेंट्स, जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची हीच सुवर्णसंधी

मिळालेल्या माहितीनुसार फेसबुक प्रोफाईल लिंक केल्यानंतर हे अकाउंट यूजर्सच्या व्हाट्सअप प्रोफाइल पेजवर दिसणार आहे. जेव्हा दुसरे युजर्स या लिंकवर क्लिक करतील तेव्हा ते या युजर्सच्या फेसबुक अकाउंटला भेट देणार आहेत. ज्या युजर्सना त्यांचे अकाउंट लिंक करायचे आहे, असे यूजर्स मेटाच्या अकाउंट सेंटरला भेट देऊन त्यांची लिंक व्हेरिफाय करू शकतात. एकदा लिंक व्हेरिफाय झाली की त्या लिंक शेजारी एक लहान फेसबुक आयकॉन दिसेल. त्यामुळे हे समजेल की ही लिंक खरी आहे की फ्रॉड आहे.

याशिवाय आणखी एक फीचर म्हणजे कंपनीने आयफोन युजर्ससाठी इन ॲप ट्रान्सलेशन फीचर्स रोल आउट करण्यास देखील सुरू वातकेली आहे. आता हे फीचर हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, चायनीज, स्पॅनिश आणि कोरियनसह 21 भाषांना सपोर्ट करते. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना सर्वात आधी लँग्वेज पॅक डाऊनलोड करावा लागणार आहे. एकदा लँग्वेज पॅक डाउनलोड केला की युजर्स हे फीचर वापरू शकणार आहेत. हे फीचर वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची देखील गरज नाही.

Web Title: Now facebook users can link their account to messaging app whatsapp tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Facebook
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण
1

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!
2

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर
3

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…
4

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.