दिवाळीच्या घर सजावटीला द्या नवा तंत्रज्ञानाचा टच, AI निवडणार तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाइन आणि कलर कॉम्बिनेशन
येत्या काही दिवसात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीच्या सणांनिमित्त घरात साफसफाई आणि रंगकाम केले जाते. आपलं घर नव्यासारखं दिसावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. घरात रंगकाम काम करताना सर्वांना पडणारा एकच प्रश्न म्हणजे आता घरात कोणता रंग द्यावा आणि कोणती डिझाईन निवडावी?
जर चुकीची डिझाईन निवडली तर इतरांना आवडणार नाही आणि आपल्या घराला आपल्याला हवा तसा लूक देखील येत नाही. अशा परिस्थितीत योग्य कलर कॉम्बिनेशन आणि परफेक्ट डिझाईन निवडणं एक मोठा आव्हान असतं. आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी AI तुम्हाला मदत करणार आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला अगदी काही क्षणातच तुमच्या घरासाठी कोणत्या रंग योग्य आहे आणि कोणती डिझाईन परफेक्ट आहे याबाबत AI माहिती देणार आहे. या AI ने दिलेल्या माहितीमुळे तुमचं घर अगदी नव्यासारखं दिसू लागेल यात काही शंकाच नाही. AI तुमची मदत कशी करणार आणि तुमच्या घरासाठी परफेक्ट डिझाईन कसे निवडणार याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्हाला ज्या AI टूल्स वापर करायचा आहे ते टूल सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये ओपन करा. आता तुम्हाला तुमच्या खोलीचा किंवा भिंतीचा फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे.
फोटो अपलोड केल्यानंतर AI खोलीतील उजेड फर्निचर आणि इतर जागा बघून काही सेकंदात डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशनबद्दल सल्ले देईल.
AI नी दिलेला सल्ल्यांमध्ये तुमचं घर कसे दिसेल आणि तुमच्या घरावरती हा रंग कसा दिसेल हे तुम्ही अगदी काही क्षणात पाहू शकता. जर तुम्हाला मॉडर्न किंवा पारंपारिक लूक पाहिजे असेल तर तुम्ही तसे सांगून त्यानुसार सल्ला घेऊ शकता.
AI तुम्हाला काही फोटो दाखवेल त्या फोटोमध्ये तुमच्या घराची डिझाईन असेल. यातील तुम्हाला जो फोटो आवडेल तो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये डाऊनलोड करू शकता.
Asian Paints Colour Visualizer: सर्वात आधी तुमच्या खोलीचा अपलोड करा आणि कोणता शेड सर्वोत्तम दिसेल हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांकडे पहा.
Nerolac Paints Visualizer App: हे अॅप तुमच्या घराचा फोटो पाहून कलर कॉम्बिनेशन आणि थीम सजेस्ट करणार आहे.
RoomGPT आणि Reimagine Home (AI Websites): या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तुमच्या खोलीचा किंवा भिंतीचा फोटो अलपोड करून 3D डिजाइन जेनरेट करू शकणार आहे, जे अगदी खऱ्यासारखं दिसणार आहे.
Canva AI Design Tool: हे केवळ रंगच नाही तर वॉल आर्ट आणि नमुने देखील सुचवते.