आता लहान मुलांसाठी देखील बनणार पॅन कार्ड, मिळणार अनेक फायदे! अशा प्रकारे करा ऑनलाइन अप्लाय
आयकर विभागाकडून पॅन कार्ड बनवण्यासाठी वयाशी संबंधित कोणताही नियम नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लहान मुलासाठी देखील आता पॅनकार्ड बनवू शकता. याला मायनर पॅन म्हणतात. लहान मुलासाठी पॅन कार्ड असण्याचे अनेक फायदे आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही अतिशय सोपी आहे आणि शुल्कही अगदी कमी आहे.
हेदेखील वाचा- Tech Tips: आठवड्यातून एकदा फोन बंद ठेवणं ठरेल फायदेशीर, बॅटरी आणि परफॉर्मंस होईल अधिक चांगला
आयकर रिटर्न भरायचे असो किंवा बँक खाते उघडायचे, अशी अनेक कामे आहेत जी आपल्याल पॅनकार्डशिवाय करता येत नाहीत. त्यामुळे पॅनकार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना वाटते की पॅन कार्ड फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिले जाते, परंतु तुम्ही चुकीचे आहात. पॅनकार्डबाबत असा कोणताही नियम नाही. तुम्ही लहान मुलाचं पॅन कार्ड देखील तयार करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अप्लाय देखिल करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
आयकर कायद्याच्या कलम 160 नुसार, तुम्ही तुमच्या मुलासाठी देखील पॅन कार्ड बनवू शकता. लहान मुलासाठी बनवलेल्या पॅनकार्डला ‘मायनर पॅन कार्ड’ म्हणतात. हे पॅनकार्ड वापरण्याची परवानगी फक्त पालकांना आहे. तुम्हाला तुमच्या मुलासाठी पॅन कार्ड बनवायचे असेल तर त्याची ऑनलाइन प्रक्रिया खूप सोपी आहे.
मुलाकडे पॅनकार्ड असण्याचे अनेक फायदे आहेत. आयकर विभागानुसार, कोणताही अल्पवयीन व्यक्ती पॅन कार्ड बनवू शकतो. यासाठी कोणताही नियम नाही. मात्र मुलगा 18 वर्षांचा झाल्यावर ते अपडेट करणे आवश्यक आहे. मायनर पॅनकार्डवर स्वाक्षरी आणि फोटो नसतो. त्यामुळे मुलगा 18 वर्षांचा झाल्यानंतर पॅन कार्ड अपडेट करावे लागेल.
गुंतवणूक: जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाने गुंतवणूक करायची असेल तर पॅन कार्ड आवश्यक असेल. तुमच्या गुंतवणुकीत तुमच्या मुलाला नॉमिनी बनवायचे असेल तर त्याचे महत्त्वही वाढते.
बँक खाते: बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
कमाई: जर मुलाकडे कमाईचे कोणतेही साधन असेल तर त्यासाठी देखील पॅन कार्ड निश्चितपणे आवश्यक असेल.
हेदेखील वाचा- Poco C75 लाँच, 5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेज सारखे फीचर्स केवळ इतक्या किंमतीत उपलब्ध