Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

व्हॉट्सॲपवर लवकरच एक नवीन फीचर जारी केलं जाणार आहे. हे फीचर इंस्टाग्रामच्या क्लोज फ्रेंड्स लिस्टसारखेच असणार आहे. यामध्ये यूजर्स ठरवू शकणार आहेत की, स्टेटस अपडेट कोणासोबत शेअर करायचा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2026 | 11:25 AM
WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

Follow Us
Follow Us:
  • नवीन फीचर स्टेटस शेअरिंगसाठी अतिशय फायद्याचं ठरणार
  • व्हॉट्सॲपवर क्लोज फ्रेंड फीचर जोडले जाणार
  • कंपनी सध्या क्लोज फ्रेंड रिंग इंडिकेटरवर काम करत आहे
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप एका नव्या फिचरची चाचणी करत आहे. हे नवीन फीचर युजर्सना इंस्टाग्राम सारखा अनुभव देणार आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर लवकरच एक खास फीचर जारी केलं जाणार आहे. हे फीचर स्टेटस शेअरिंगसाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे. लवकरच मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर इंस्टाग्रामसारखे क्लोज फ्रेंड फीचर जोडले जाणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अशी आशा व्यक्त केली जात आहे की या नव्या अपडेटसह युजर्सना त्यांचे स्टेटस अपडेट कोण पाहणार यावर नियंत्रण मिळवण्याचा पर्याय मिळणार आहे.

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सॲपमध्ये युजर्सना वैयक्तिक शेअरिंगचा अनुभव मिळणार आहे. हे फीचर आता चाचणी टप्प्यात आहे आणि मोठ्या रोलआऊटपूर्वी हे अपडेट बीटा टेस्टर्ससाठी जारी केले जाणार आहे. जर हे फीचर सर्वांसाठी रोल आउट केले गेले तर युजर्सना प्रायव्हसी सेटिंग ऍडजस्ट करण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे आता युजर्स ठरवू शकणार आहेत की त्यांचे अपडेट कोण पाहू शकणार आणि कोण नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

व्हॉट्सॲपमध्ये स्टेटस शेअरिंगसाठी आता एक नवीन अपडेट येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी सध्या क्लोज फ्रेंड रिंग इंडिकेटरवर काम करत आहे. फीचर ट्रॅकर WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, स्टेटस अपडेटसाठी क्लोज फ्रेंड फीचर अँड्रॉईड वर्जन 2.26.5.13 साठी व्हॉटसॲप बीटामध्ये चाचणीसाठी उपलब्ध आहे. व्हॉटसॲपने अद्याप घोषणा केली नाही की हे फीचर यूजर्ससाठी कधी रिलीज केले जाणार आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, मेटाच्या मालकीचे प्लॅटफॉर्म स्टेटस अपडेटसाठी कस्टम कॉन्टॅक्ट लिस्ट डेवलप करत आहे. ज्यामुळे युजर्स प्रत्येक पोस्टसाठी प्राइवेसी सेटिंग्स बदलण्याऐवजी लोकांना पर्सनलाइज्ड कॅटेगरीमध्ये ग्रुप तयार करू शकतील. प्लॅटफॉर्म एक डेडिकेटेड क्लोज फ्रेंड लिस्टवर काम करत आहे, जे युजर्सना निवडक कॉन्टॅक्टसोबत अपडेट शेअर करण्याची परवानगी देणार आहे.

यूजर्सना आता क्लोज फ्रेंड लिस्ट सेटअप करण्याचा पर्याय मिळणार आहे. यासाठी दोन वेगळ्या पद्धती उपलब्ध असण्याची शक्यता आहे. युजर्स आता थेट स्टेटस प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाणून कॉन्टॅक्ट मॅनेज करू शकणार आहेत. व्हॉट्सॲप यूजर्सना कधीही यादीत बदल करण्याची परवानगी देईल, जरी अपडेट्स फक्त सुधारणा केल्यानंतर केलेल्या स्टेटस पोस्टवर परिणाम करतील. तसेच यूजर्सना कोणत्याही क्षणी लिस्ट मॉडिफाय करण्याची परवानगी मिळणार आहे. तथापि, अपडेट्स फक्त मॉडिफिकेशन केल्यानंतर केलेल्या स्टेटस पोस्टवर परिणाम करतील.

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार प्रिझम विंग्ज आणि एंजेलिक स्काय आऊटफीट… अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

फीचर ट्रॅकरने असा दावा देखील केला आहे की, लिस्टमध्ये समाविष्ट कॉन्टॅक्ट्सना यूजरच्या प्रोफाइल पिक्चरच्या चारी बाजूला एक वेगळ्या रंगाची रिंग दिसेल. ज्यामुळे यूजर्सना समजू शकेल की, स्टेटस क्लोज फ्रेंड्ससाठी शेअर करण्यात आला आहे. हे फीचर इंस्टाग्राम क्लोज फ्रेंड लिस्टप्रमाणेच काम करते. अलिकडच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की व्हॉटसॲप एक पर्यायी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील विकसित करत आहे जो प्रीमियम स्टिकर्स, थीम आणि अतिरिक्त चॅट पिनिंग सारख्या विशेष वैशिष्ट्यांना अनलॉक करेल.

Web Title: Whatsapp is planning to roll out new feature like instagram closed friends list know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.