Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण करा मार्क, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

गुगलकडे अनेक सेवा आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करतात. गुगल मॅप हे जगभरातील असंख्य वापरकर्त्यांसाठी एक विश्वसनीय नेव्हिगेशन ॲप आहे जे तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी कार्य करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2024 | 09:42 AM
Google Map Update: गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण करा मार्क, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Google Map Update: गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण करा मार्क, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅपवर अशी अनेक फीचर्स आहेत ज्यांच्या मदतीने तुमच्या आवडत्या ठिकाणी जाणं अगदी सोपं होतं. आता आम्ही तुम्हाला अशा एका फीचबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण मार्क करू शकता आणि सेव्ह देखील करू शकता. ही संपूर्ण प्रोसेस अगदी सोपी आहे. गुगलने आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर्स आणली आहेत, जी अनेक लोक वापरतात. अशाच एका सुविधेत गुगल मॅप्सचीही गणना होते. गुगल मॅप तुम्हाला तुमचा मार्ग शोधण्यात, नेव्हिगेट करण्यात मदत करते.

हेदेखील वाचा- Google Map Update: आता गुगल मॅप रस्त्याची रुंदीसुध्दा सांगणार, 8 शहरांमध्ये सुरू होतेय नवी सुविधा

गुगल मॅप्स तुम्हाला सेव्ह प्लेसेस नावाचा एक पर्याय देतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणांपैकी कोणतीही ठिकाणे सहजपणे मार्क करू शकता. मग ते कॅफे असो किंवा पिकनिक स्पॉट. तुम्ही कोणतंही ठिकाण अगदी क्षणाधार्त मार्क करू शकता. पण यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

डेस्कटॉपवरील गुगल मॅपवर प्लेस मार्क करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • सर्वात आधी तुमच्या डेस्कटॉपवरील वेब ब्राउझरवर गुगल मॅप ओपन करा.
  • आता तुमचे आवडतं ठिकाण शोधा किंवा सर्च बारमध्ये त्या ठिकाणाचं नाव सर्च करा किंवा थेट मॅपवर क्लिक करा आणि झूम इन करून तुमचं आवडतं ठिकाण शोधा.
  • आता ठिकाणाच्या नावावर किंवा मार्करवर क्लिक करा, जे डिटेलसह पॉप-अप एक्टिव करेल.
  • पत्त्याच्या खाली किंवा पॉप-अपमध्ये सहसा सेव्ह बटण असते.
  • त्यावर क्लिक करा आणि लिस्ट निवडा. या लिस्टमध्ये ‘Favorites’ किंवा ‘Want to Go’ असे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय ‘New List’ वर क्लिक करून तुम्ही नवीन यादी तयार करू शकता.

हेदेखील वाचा- Google Map Update: आता खोट्या फीडबॅकपासून युजर्सची होणार सुटका, गुगल मॅप घेऊन आलाय नवीन वॉर्निंग सिस्टम

स्मार्टफोनवरील गुगल मॅपवर प्लेस मार्क करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • प्रथम तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर गुगल मॅप ॲप इंस्टॉल करा.
  • आता गुगल मॅपवर सर्च किंवा ब्राउझ करून आपले आवडते ठिकाण शोधा.
  • यानंतर, त्याचे डिटेल पेज पाहण्यासाठी लोकेशनचे नाव किंवा मार्कर टॅप करा.
  • स्क्रीनच्या तळाशी असलेले ‘सेव्ह’ बटण शोधा, ज्यामध्ये बुकमार्क चिन्ह असू शकते.
  • आता ‘सेव्ह’ वर टॅप करा आणि दिलेल्या लिस्टमधून टॅग निवडा.

गुगल मॅपचं नेव्हिगेशन फीचर युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

गुगल मॅप आपल्या युजर्ससाठी नेव्हिगेशन फिचर देखील घेऊन आला आहे. गुगल मॅपच्या मल्टी-कार नेव्हिगेशन फीचरचास प्रवासावेळी बराच फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या रस्ता चुकलात तर हे फीचर तुम्हाल सांगेल की इतर लोकं कोणत्या मार्गाने जात आहेत. यामुळे तुम्हाला एकटे वाटणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास सुरू करणाऱ्या लोकांना विशिष्ट वेळी त्यांच्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅपचं नेव्हिगेशन फीचर मदत करणार आहे.

लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणत्या वेगाने गाडी चालवावी हे देखील या फीचरमध्ये सांगितलं जाणार आहे. हे फीचर तुम्हाला सांगेल की तुमच्यासाठी कोणता मार्ग चांगला आहे आणि तुम्ही तुमचे वाहन कोणत्या वेगाने चालवावे.गुगल मल्टी-कार नेव्हिगेशन फीचर (गुगल मॅप्स नवीन फीचर) केवळ स्मार्टफोनवरच उपलब्ध होणार नाही, तर यूएसबी किंवा ब्लूटूथद्वारे कनेक्ट केलेल्या कार उपकरणांवरही काम करेल.

Web Title: Now you can mark your favorite location on google map just follow this easy process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 09:42 AM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.