Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं… असं काम करणार नवं फीचर

OnePlus 15 यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच या स्मार्टफोनमध्ये गुगल क्विक शेअरद्वारे अ‍ॅपल एअरड्रॉप सुसंगतता मिळणार असून, आयफोन, आयपॅड आणि मॅकवर फाइल्स शेअर करणे अधिक सोपे होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 12:03 PM
Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं... असं काम करणार नवं फीचर

Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं... असं काम करणार नवं फीचर

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस 15 मध्ये गुगल क्विक शेअरद्वारे अ‍ॅपल एअरड्रॉप सुसंगतता मिळणार असून, अ‍ॅपल डिव्हाइसेसवर थेट फाइल्स पाठवता येणार आहेत.
  • या फीचरमुळे थर्ड-पार्टी अ‍ॅप्स किंवा क्लाउड ट्रान्सफर सर्व्हिसची गरज न पडता फाइल शेअरिंग करता येईल.
  • क्विक शेअरचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट केल्यानंतर हे फीचर उपलब्ध होणार असून, अतिरिक्त सॉफ्टवेअर अपडेटची आवश्यकता नसणार आहे.
Oneplus 15 युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच वनप्लस 15 युजर्सना गुगलच्या क्विक शेअर प्लॅटफॉर्मद्वारे अ‍ॅपलच्या एअरड्रॉप फाइल शेअरिंग सिस्टीमचा सपोर्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे फिचर सुसंगत अँड्रॉईड डिव्हाईस आणि अ‍ॅपल प्रोडक्ट्स जसे आयफोन, आयपॅड आणि मॅक यांच्यामध्ये फाईल ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीममधील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

क्रॉस प्लॅटफॉर्म फाईल शेअरिंग

गुगलने यापूर्वी हे फिचर निवडक पिक्सेल डिव्हाईसवर सादर केले होते. त्यानंतर काही अँड्रॉइड ब्रँड्ससाठी देखील फिचर रोल आउट करण्याचा निर्णय घेण्यात आला. अलीकडेच शाओमीने देखील त्यांच्या HyperOS 3 द्वारे एअर ड्रॉप सुसंगतीची घोषणा केली होती. यामुळे अँड्रॉइड इकॉसिस्टीममधील क्रॉस प्लॅटफॉर्म फाईल शेअरिंगचा वाढता ट्रेंड पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

थेट सपोर्टेड अ‍ॅपल डिव्हाईसवर पाठवा फाईल्स

अँड्रॉइड ऑथोरिटीने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, क्विक शेअरद्वारे वनप्लस 15 वर एअरड्रॉप सुसंगता दिसण्यास सुरुवात झाली आहे. पब्लिकेशनने असा दावा केला आहे की, त्यांनी स्वतः एका वनप्लस 15 युनिटवर या नवीन सुविधेची चाचणी केली आहे. वनप्लस कम्युनिटी फोरमवरील एका वेगळ्या पोस्टने असे संकेत मिळत आहेत की, अनेक युजर्सना त्यांच्या वनप्लस 15 डिव्हाईसवर हे फीचर मिळाले आहे. या इंटीग्रेशनच्या मदतीने वनप्लस 15 यूजर्स कोणत्याही थर्ड-पार्टी अ‍ॅप्लिकेशन किंवा क्लाउड-बेस्ड ट्रांसफर सर्विसवर अवलंबून न राहता, थेट सपोर्टेड अ‍ॅपल डिव्हाईसवर फाईल्स पाठवू शकतात. गुगलने अ‍ॅपल एअरड्रॉपसह फाईल एक्सचेंजसाठी क्विक शेअर सपोर्ट सादर करण्याच्या काही महिन्यांनंतर वनप्लस 15 यूजर्ससाठी इंटीग्रेशन रोलआऊट केलं जात आहे.

रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सध्या वनप्लस 15 एकमेव असा वनप्लस स्मार्टफोन आहे, ज्याच्यासाठी हे नवं फीचर रोलआऊट केलं जात आहे. वनप्लस 13 सह जुने प्लॅगशिप मॉडेल्स सध्या सपोर्टेड डिव्हाईसच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. हीच गोष्ट सध्या कंपनीच्या प्रिमियम टॅब्लेट्सवर देखील लागू होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded Wheel ईव्हेंट! स्पिन करा आणि जिंका मजेदार रिवॉर्ड्स… वाचा प्रोसेस

विशेष म्हणजे, वनप्लसची सिस्टर ब्रँड असलेल्या ओप्पोचे फाईंड एक्स 8 स्मार्टफोन्स आधीपासूनच या फंक्शनलिटीला सपोर्ट करणाऱ्या संभाव्य डिव्हाईसच्या यादीत समाविष्ट आहेत. गुगल, विवो आणि ओप्पोच्या काही दुसऱ्या डिव्हाईसबाबत असं सांगितलं जात आहे की, हे क्रॉस-प्लॅटफॉर्म फाइल-शेयरिंग सिस्टिमला सपोर्ट करतात. ज्यामध्ये पिक्सेल 9 सिरीज, पिक्सेल 8a, विवो X300 अल्ट्रा आणि ओप्पो फाइंड X9 फॅमिली समाविष्ट आहे.

कधी मिळणार नवं फीचर?

रिपोर्टनुसार, जेव्हा गुगल प्ले स्टोअरद्वारे क्विक शेअर डिव्हाईसच्या लेटेस्ट वर्जनवर अपडेट केले जाईल, तेव्हा हे फीचर उपलब्ध होणार आहे. यासाठी वनप्लस 15 यूजर्सना कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट किंवा कॉन्फिगरेशनमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. अ‍ॅपल डिव्हाईसवर फाईल रिसीव्ह करण्यासाठी यूजर्सना ‘एव्हरीवन’वर एअरड्रॉप रिसेप्शन तात्पुरते सक्षम करावे लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वनप्लस कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: OnePlus ही चीनची स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.

  • Que: वनप्लसची स्थापना कधी झाली?

    Ans: वनप्लसची स्थापना 2013 मध्ये झाली होती.

  • Que: वनप्लसचे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, वनप्लस स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स, प्रीमियम डिझाइन आणि फास्ट चार्जिंगसाठी ओळखले जातात.

Web Title: Oneplus 15 users get airdrop like file sharing support transferring files to iphone becomes easier

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • apple
  • google
  • oneplus

संबंधित बातम्या

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
1

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स
2

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी
3

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
4

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.