सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा
AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता
या ॲडव्हायझरीनुसार लहान मुलांचे फोटो, त्यांचे नाव, वर्ग, शाळेची माहिती, लोकेशन आणि रियल टाईम अपडेट्स यासारखी माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. सध्याच्या डिजिटल काळात लहान मुलांची प्रायव्हसी आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी आपण सोशल मीडियावर कोणत्या पोस्ट शेअर करत आहोत याबाबत जागरूकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
शेअर करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीमध्ये लहान मुलांची जास्त माहिती ऑनलाईन शेअर केल्यास कोणते धोके निर्माण होऊ शकतात, यावर अधिक जोर देण्यात आला आहे. सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरील या माहितीचा वापर करून फेक प्रोफाइल्स तयार करणे, आइडेंटिटी थेफ्ट (ओळख चोरी) करणं किंवा साइबर बुलिंग सारख्या पद्धतींचा वापर करून लहान मुलांना टार्गेट करू शकतात. अथॉरिटीजने AI-पावर्ड इमेज मॅनिपुलेशन आणि मॉर्फिंग टेक्नोलॉजीबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोटो बदलून त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
या व्यतिरिक्त ऑनलाइन उपलब्ध असलेल्या या खाजगी माहितीचा वापर लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशावेळी फ्रॉड, सोशल इंजीनियरिंग अटॅक्स किंवा इतर सायबर धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे तज्ञ नेहमी पालकांना सल्ला देतात की, लहान मुलासंबंधित कोणतीही माहिती शेअर होत असणारा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी विचार करा.
आसाम पोलिसांनी शिफारस केली आहे की, पालकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी लहान मुलांसंबंधित कंटेट ऑनलाईन पोस्ट करण्यापूर्वी त्याची योग्य पद्धतीने पडताळणी करा. असे काही देखील काही यूजर्स असतात, जे लहान मुलांचे फोटो त्यांचे नाव, वर्गाची माहिती, लोकेशन किंवा विविध लाईव्ह अपडेट्स आणि पर्सनल डिटेल्ससह शेअर करतात. अशा यूजर्सना विशेष काळजी घेण्याची आणि सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांची सुरक्षा आणि त्यांची प्रायव्हसी टिकून राहील याला प्राधान्य दिले पाहिजे.
Ans: सोशल मीडिया हे इंटरनेट-आधारित प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे लोक माहिती, फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करू शकतात.
Ans: माहितीची देवाणघेवाण, मनोरंजन, नेटवर्किंग, व्यवसाय प्रचार आणि शिक्षणासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरतो.
Ans: फेक न्यूज, सायबर फसवणूक, गोपनीयतेचा धोका आणि स्क्रीन टाइम वाढणे हे काही प्रमुख तोटे आहेत.






