OnePlus Nord Buds 3r: डिझाईन अशी की पाहताच प्रेमात पडाल! तब्बल 54 तासांची बॅटरी लाईफ आणि 3D ऑडियो सपोर्टने सुसज्ज
OnePlus ने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन आणि अनोखी डिझाईन असलेले ईअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने नवीन ईअरबड्स OnePlus नॉर्ड बड्स 3आर या नावाने लाँच केले आहेत. या ट्रूली वायरलेस स्टीरियो हेडसेटमध्ये चार्जिंग केससह एकूण 54 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. या नव्या ईअरबड्सना पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP55 रेटिंग देण्यात आले आहे. याशिवाय हे बड्स 12.4 मिमी टाइटेनियम डायनेमिक ड्राइवर आणि खास AI-Supported कॉल नॉइज कँसलेशन सुविधा देखील ऑफर करतात. यासोबतच या बड्समध्ये डुअल-डिवाइस कनेक्टिविटी देखील ऑफर केली जाते.
OnePlus Nord Buds 3r दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहेत. याची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या बड्सची किंमत 1600 रुपयांहून कमी आहे. हे बड्स ब्लूटूथ 5.4 आणि गूगल फास्ट पेयरला सपोर्ट करतात. बड्समध्ये एका टॅप जेश्चरने व्हॉइस असिस्टंटशी कनेक्ट होण्याची सुविधा देखील आहे. यात देण्यात आलेल्या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार साउंड एडजस्ट करू शकता. (फोटो सौजन्य – X)
वनप्लसने लाँच केलेल्या या नवीन ईअरबड्सची सुरुवातीची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र तुम्ही लिमिटेड टाईम ऑफरसह हे बड्स 1,599 रुपयांना खरेदी करू शकता. हे बड्स दोन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ऑरा ब्लू आणि ऐश ब्लॅक यांचा समावेश आहे. या बड्सची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरु होणार असून ग्राहक हे बड्स वनप्लस इंडिया ई-स्टोर, वनप्लस स्टोर ऐप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोर्स, अमेजन, फ्लिपकार्टसह इतर ऑनलाइन प्लेटफॉर्मवरून खरेदी करू शकणार आहेत.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर वनप्लस नॉर्ड बड्स 3 आरमध्ये 12.4 मिमी टाइटेनियम-कोटेड डायनेमिक ड्राइवर्स देण्यात आले आहेत. बड्समध्ये तुम्हाला तीन प्रीसेट EQ मोड्स देखील पाहायला मिळणार आहेत. यासोबतच तुम्ही साउंड मास्टर EQ फीचरचा वापर करून कस्टमाइजेबल सिक्स-बँड इक्वलाइजरसह तुमच्या गरजेनुसार साउंड एडजस्ट करू शकता. एवढंच नाही तर या बड्समध्ये तुम्हाला 3D ऑडियो सपोर्ट देखील देण्यात आला आहे. जे एक इमर्सिव्ह 360-डिग्री साउंडस्टेज देते असे म्हटले जाते.
कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर या बड्समध्ये ब्लूटूथ 5.4 आणि गूगल फास्ट पेयर देण्यात आला आहे. यासोबतच बड्समध्ये डुअल-डिवाइस कनेक्टिविटीचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच यामध्ये बिल्ट-इन गेमिंग मोड देखील देण्यात आला आहे. गेमिंग मोडचा वापर करून 47ms पर्यंत लो-लेटेंसी मिळणार आहे. यासोबतच, बड्समध्ये एका टॅप जेश्चरने व्हॉइस असिस्टंटशी कनेक्ट होण्याची सुविधा देखील आहे. सर्वात खास रिअल-टाइम भाषा सहाय्यासाठी बड्समध्ये एआय ट्रान्सलेशन सपोर्ट देखील आहे.