
फोटो सौजन्य सोशल मिडिया
ओप्पोने भारतीय ग्राकांसाठी ‘Enco X4’ इअरबड्स दाखल केले आहेत. अवघ्या 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 14 तास चालणाऱ्या या बड्समध्ये ब्लूटूथ 6.1 कनेक्टिव्हिटी आणि ड्युअल-ड्रायव्हर ऑडिओ सेटअप पाहण्यास मिळतो. यात धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP55 रेटिंग असलेल्या या प्रीमियम इअरबड्सची खुली विक्री 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
लाँचिंग ऑफर्स अंतर्गत, ग्राहक सध्या ओप्पोच्या अधिकृत वेबसाईटवरून हे बड्स 18,999 रुपयांच्या मध्ये विकत घेत आहेत. याशिवाय, ग्राहकांसाठी 1,667 रुपये प्रतिमहिना या सुरुवातीच्या नो-कॉस्ट EMI चा पर्यायही दिला जात आहे. भारतात याची अधिकृत खुली विक्री29 ऑक्टोबर, 2026 पासून ओप्पो वेबसाईट, Amazon India आणि इतर प्रमुख किरकोळ स्टोअर्सच्या माध्यमातून सुरू होईल.
भारतात Oppo Enco X4 ची अधिकृत किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे प्रीमियम इअरबड्स दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होतील, ग्लेशियर व्हाईट आणि ऑरोरा व्हायोलेट.
संगीतप्रेमींसाठी या इअरबड्समध्ये कंपनीच्या ऑडिओ ट्युनिंगचा समावेश आहे. यामुळे संगीत ऐकताना अधिक चांगला ऑडिओ अनुभवता येणार आहे. गाणी, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी हे इअरबड्स उपयुक्त ठरणार आहेत.
Oppo Enco X4 TWS इअरबड्सची किंमत 19,999 रुपये असून हा प्रीमियम ऑडिओ ट्युनिंग, दीर्घ बॅटरी बॅकअप आणि नॉईज कॅन्सलेशन यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे हे इअरबड्स प्रीमियम वायरलेस ऑडिओ श्रेणीत येतात.
Oppo Enco X4 मध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC)हे फीचर देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे आजूबाजूचा अनावश्यक आवाज कमी करण्यास मदत होते. प्रवासादरम्यान किंवा गोंगाटाच्या ठिकाणी संगीत ऐकताना या फीचरचा फायदा होतो.
Ans: इअरबड्सची अधिकृत किंमत 19,999 रुपये आहे.
Ans: खुली विक्री 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार.
Ans: 53 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देतात.