Oppo Find X8 Mini स्मार्टफोन लाँचिंगची तयारी सुरु, 100W चार्जिंग सपोर्टसह करणार एंट्री
Oppo ने काही दिवसांपूर्वीच चीनी बाजारात Oppo Find X8 आणि Find X8 Pro हे दोन नवीनतम स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता कंपनी या सिरीजमधील आणखी एका स्मार्टफोनवर काम करत असल्याचं सांगितलं जात असून हा स्मार्टफोन लवकरच नवीन फीचर्स आणि प्रिमियम डिझाईनसह एंट्री घेऊ शकतो. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Oppo Find X8 Mini असू शकतो. नवीन स्मार्टफोन लाँच होण्याआधीच त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
हेदेखील वाचा- पैसे खर्च न करता ठीक होणार आयफोनचा कॅमेरा, टेक जायंट Apple युजर्सना देतेय मोफत सेवा
Oppo Find X8 Mini फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये प्रवेश करू शकते. हा स्मार्टफोन Find X8 अल्ट्रा मॉडेलसह लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केली नाही. मात्र लवकरच कंपनीचा नवीन स्मार्टफोन Oppo Find X8 Mini 100W चार्जिंग सपोर्टसह एंट्री करणार असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – X)
Oppo Find X8 Mini फोनबद्दल अधिक माहिती एका चायनीज टिपस्टरने दिली आहे. एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, Oppo एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Oppo Find X8 Ultra सोबत लाँच केला जाऊ शकतो, जो येत्या काही महिन्यांत लाँच होण्याची अपेक्षा आहे. टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा हा नवीन हँडसेट Oppo Find X8 Mini असू शकतो. लक्षात घेण्यासारखे आहे की कंपनीने अद्याप या फोनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
Oppo चा आगामी स्मार्टफोन Oppo Find X8 Mini हा Vivo X200 Pro Mini सोबत स्पर्धा करू शकतो. Vivo X200 Pro Mini ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo X200 Pro Mini हे X200 Pro सिरीजमधील Vivo चे सर्वात लहान मॉडेल आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9400 चिपद्वारे समर्थित आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत RAM सह देण्यात आले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाची LTPO AMOLED स्क्रीन आहे.
हेदेखील वाचा- Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! One UI 7 बीटाची रिलीज डेट जाहीर, AI सह मिळणार अनेक नवीन फीचर्स
हे तीन 50-मेगापिक्सेल कॅमेरे (प्राथमिक, अल्ट्रावाइड आणि पेरिस्कोप टेलीफोटो), तसेच 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह सुसज्ज आहे. Vivo वर 1TB पर्यंत स्टोरेज मिळू शकते यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हा Android 15 वर चालतो, जो कंपनीच्या OriginOS 5 स्किनवर आधारित आहे.
Oppo Find X8 आणि Find X8 Pro स्मार्टफोनमध्ये AI इरेज, AI अँटी रिफ्लेक्शन, AI डी-ब्लर सारखे AI फीचर्स देण्यात आले आहेत. Find X8 मध्ये 5,630mAh बॅटरी आहे आणि X8 Pro मध्ये 5,910mAh बॅटरी आहे. दोन्हीमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. यात 10W रिव्हर्स चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे. त्यांना पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना IP68 रेटिंग मिळाले आहे. कंपनी त्यांना फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये आणत आहे.