Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! One UI 7 बीटाची रिलीज डेट जाहीर, AI सह मिळणार अनेक नवीन फीचर्स
सॅमसंग युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक कंपनी सॅमसंग Android 15 आधारित One UI 7 अपडेट रोल आउट करण्याची योजना आखत आहे. हे अपडेट येत्या काही दिवसांतच म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत रोल आऊट केलं जाऊ शकतं. कंपनी अनेक खास वैशिष्ट्यांसह आगामी सॉफ्टवेअर रिलीज करणार आहे. या अपडेटमध्ये युजर्सना AI सह मिळणार अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- जगातल्या प्रत्येक कॅमेऱ्याचा चेहरा गोल, मग फोटो चौकोनी का? कारण वाचून चकीत व्हाल
सॅमसंगने खुलासा केला आहे की त्याचे बीटा वर्जन प्रथम रिलीज होतील आणि नंतर फाइनल वर्जन रोलआउट केलं जाईल. कंपनी येत्या काही दिवसांत One UI 7 चे पहिलं बीटा वर्जन रिलीज करू शकते, परंतु फाइनल वर्जनची टाइमलाइन अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बीटा वर्जनमध्ये, फाइनल अपडेट येण्यापूर्वीच युजर्स नवीन वैशिष्ट्यांचा आनंद घेण्यास सुरुवात करतील. सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी बीटा वर्जन कधी रिलीज केली जाऊ शकते आणि त्यात कोणती वैशिष्ट्ये असू शकतात, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
सॅमसंगने म्हटले आहे की, कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वन UI 7 बीटा डेव्हलपरसाठी रोल आउट करेल. त्याच वेळी, आता एका पोस्टमध्ये म्हटले आहे की सॅमसंगला Android 15 वर आधारित वन UI 7 बीटा अपडेट आणण्यासाठी अर्धा महिना अधिक लागेल. Samsung च्या One UI 7 बीटा अपडेटला या वर्षी लक्षणीय विलंब झाला आहे.
हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार Google Pixel 9A स्मार्टफोन, 8GB रॅम आणि Google Tensor G4 चिपसेटने सुसज्ज
सॅमसंगचं वन UI 7 बीटा अपडेट ऑगस्टमध्ये रोल आऊट होण्याची अपेक्षा होती. मात्र आता हे अपडेट येत्या काही दिवसांतच म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत रोल आऊट केलं जाऊ शकतं. Galaxy S25 सिरीजसह स्टेबल वर्जन रिलीज लाँच केलं जाणार आहे. मात्र हे लाँचिंग पुढील वर्षा होणार असल्याचं समोर आलं आहे. Samsung Galaxy S24 सिरीज One UI 7 अपडेट मिळवणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो.
Samsung ने ‘Samsung Developers Conference’ मध्ये आपल्या Android 15 आधारित One UI 7 अपडेटमध्ये येणाऱ्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली नाही. पण त्याच्या आगमनापूर्वीच फिचर्सची माहिती समोर आली आहे. सॅमसंगचे One UI 7 अपडेट डायलर, मॅसेजेस, गॅलरी, कॅल्क्युलेटर आणि क्लॉक ॲप्ससह अनेक सिस्टीम ॲप आयकॉनमध्ये नवीन रंग आणेल. दरम्यान या अपडेटमध्ये नोटिफिकेशन हँडलिंग देखील दिलं जाऊ शकतं.
One UI 7 अपडेटमध्ये येणाऱ्या इतर वैशिष्ट्यांमध्ये गॅलरी ॲपसाठी नवीन AI वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, जे वापरकर्त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून त्यांच्या पोर्ट्रेट ईमेजना “रीस्टाईल” करण्यास परवानगी देईल. तसेच, स्केच टू इमेज फीचर देखील अपडेटमध्ये समाविष्ट केले जाईल. Samsung Galaxy स्मार्टफोन्सना देखील Google च्या होमवर्क हेल्प वैशिष्ट्यासाठी समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे जी या वर्षाच्या सुरुवातीला Google I/O वर दर्शविली गेली होती.