फोटो सौजन्य - Google Play Store
भारताचा शेजारील देश पाकिस्तान स्वत:चा मॅसेजिंग ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे. Beep Pakistan असं या मॅसेजिंग ॲपचं नाव आहे. सध्या हा ॲप केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. लवकरच हा ॲप पाकिस्तानच्या इतर नागरिकांसाठी देखील उपलब्ध होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये सर्वत्र Beep Pakistan सुरु करण्यात आला तर तिथे WhatsApp वर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये यापूर्वीच अनेक सोशल मिडीया ॲप्स बॅन करण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांचा समावेश आहे. आता Beep Pakistan ॲपच्या लाँचिंगमुळे पाकिस्तानात WhatsApp वर देखील बंद घातली जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेदेखील वाचा- Free Fire Max च्या OB45 अपडेनंतर ‘हे’ 5 पेट तुमचं कॅरेक्टर बनवतील पावरफुल
राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान मंडळाचे प्रमुख बाबर माजिद भाटी यांनी Beep Pakistan ॲप डिझाईन केलं आहे. बाबर माजिद भाटी यांनी सांगितलं आहे की, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील अधिकृत संवाद सुधारण्यासाठी आणि गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी Beep Pakistan ॲप तयार करण्यात आलं आहे. Beep Pakistan ॲपच्या मदतीने गोपनीयतेसह डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी देखील मदत होणार आहे. सध्या फक्त सरकारी कर्मचारीच Beep Pakistan ॲपचा वापर करू शकतात. ॲप तयार झाला असून आमच्या मंत्रालयात या ॲपची चाचणी केली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर Beep Pakistan ॲप सुरु केलं जाईल.
हेदेखील वाचा- जबरदस्त डिस्काउंट आणि भन्नाट ऑफर्ससह Flipkart चा बिग बजेट डेज सेल सुरु!
बाबर माजिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत Beep Pakistan ॲप सरकारी विभागांमध्ये सुरू केलं जाईल. Beep Pakistan ॲपची सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp सोबत कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. गोपनीयता आणि डेटा सुरक्षा लक्षात घेऊन WhatsApp चा वापर बंद करण्यात येत असून आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Beep Pakistan हे नवीन मॅसेजिंग ॲप आणत आहोत. ॲप अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे की ते सामान्य वापरासाठी देखील वाढवता येईल. याशिवाय भविष्यातील परिस्थिती पाहून व विचार करून Beep Pakistan ॲप सर्वसामान्यांसाठीही उपलब्ध करून देता येईल.
पाकिस्तान स्वत:चा मॅसेजिंग ॲप Beep Pakistan लाँच करण्याच्या तयारीत आहे. या Beep Pakistan ॲपमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानमध्ये आता WhatsApp सेवा बंद होणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण पाकिस्तानने यापूर्वी देखील अनेक सोशल मिडीया ॲप्सवर बंदी घातली होती. ज्यामध्ये एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी झाल्यामुळे शाहबाज सरकारने एक्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायमची बंदी घालण्याचा आवाजही पाकिस्तानी लष्कराकडून उठवण्यात आला आहे. त्यानंतर आता Beep Pakistan ॲपच्या लाँचिंगमुळे पाकिस्तानात WhatsApp वर देखील बंद घातली जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.