फोटो सौजन्य - pinterest
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart नेहमीच त्याच्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स सेल घेऊन येत असतो. सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट आणि भन्नाट ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळते. आता पुन्हा एकदा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart त्यांच्या ग्राहकांचा आवडता बिग बजेट डेज सेल घेऊन आला आहे. आज 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून हा सेल सुरू झाला आहे. पुढील 5 दिवस हा सेल.सुरू राहणार आहे.
हेदेखील वाचा- रक्षाबंधनाला भावाला ऑनलाईन राखी पाठवायची आहे? ‘या’ वेबसाईट करतील सुपरफास्ट डिलिव्हरी
5 ऑगस्ट रोजी या सेल चा शेवटचा दिवस आहे. 5 दिवसात ग्राहकांना Flipkart वर अनेक उत्कृष्ट डील मिळणार आहेत. या पाच दिवसांच्या सेल दरम्यान, Flipkart आपल्या ग्राहकांना विविध वस्तूंच्या शॉपिंगवर मोठे डिस्काउंट, आकर्षक ऑफर आणि विशेष डील देत आहे. बिग बजेट डेज सेलमध्ये ग्राहकांना प्रचंड सवलत तसेच एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय, बँक ऑफर्स आणि इतर अनेक आकर्षक डील मिळत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही Flipkart ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन ऑफर आणि प्रॉडक्ट्स सादर करण्याची तयारी केली आहे.
हेदेखील वाचा- OnePlus युजर्ससाठी खुशखबर! मोफत बदलली जाणार ‘या’ फोनची स्क्रीन
Flipkart च्या या बिग बजेट डेज सेल दरम्यान, ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फॅशन, घरगुती वस्तू आणि इतर अनेक गोष्टींवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. बिग बजेट डेज सेलमध्ये ग्राहकांना प्रचंड सवलत तसेच एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय, बँक ऑफर्स आणि इतर अनेक आकर्षक डील मिळत आहेत.
Flipkart सेल दरम्यान जे युजर्स HDFC बँक, HSBC बँक, IDFC फर्स्ट बँक आणि One Card द्वारे पेमेंट करतील त्यांना प्रत्येक वस्तूच्या EMI वर 10% त्वरित सूट मिळेल.
तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बिग बजेट डेज सेलमध्ये सर्वात अप्रतिम ऑफर मिळत आहेत. स्मार्टफोनसाठी, Apple, Samsung, Xiaomi आणि OnePlus सारख्या प्रमुख ब्रँडवर विशेष डिस्काउंट देण्यात आलं आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञानासह स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरही उत्तम डील्स उपलब्ध होणार आहेत. याशिवाय तुम्ही या सेलद्वारे एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि इतर स्वयंपाकघरातील उपकरणे खरेदी केल्यास तुम्हाला अनेक खास डील्स आणि डिस्काउंट देखील मिळत आहे.
Flipkart च्या बिग बजेट डेज सेलमध्ये फॅशन शॉपिंग वर देखील मोठं डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला फॅशन शॉपिंग करायचे असेल, तर या सेलमध्ये तुम्हाला ट्रेंडी कपडे, शुज आणि ॲक्सेसरीजवर भरघोस डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये ब्रँडेड कपडे आणि स्टायलिश ॲक्सेसरीजचा समावेश असेल.