Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लवकरच बिग बिलियन डेज सेल 2025 सुरु होणार आहे. कंपनीने या सेलची अधिकृत घोषणा केली असून सेलमधील काही ऑफर्सबाबत देखील माहिती समोर आली आहे. ग्राहक या आगामी सेलसाठी अत्यंत उत्सुक आहेत. या सेल दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्सपासून ते इतर अनेक उत्पादनांवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. ग्राहक त्यांच्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी सेलची वाट बघत होते. मात्र हा सेल सुरु होण्यापूर्वीच स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 च्या आधी, Google प्रीमियम 5G फोन, Google Pixel 9 Pro वर एक उत्तम डिस्काउंट ऑफर मिळत आहे. ज्यामुळे हा फोन त्याच्या लाँच किंंमतीपेक्षा तब्बल 10 हजार रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला या उत्तम डीलबद्दल सविस्तर जाणून घेऊया… (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलने भारतात गेल्या वर्षी Google Pixel 9 Pro हे डिव्हाईस लाँच केले होते. या स्मार्टफोनची लाँच किंमत 1,09,999 रुपयांनी सुरु होते. मात्र आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. सध्या हा प्रिमियम स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 99,999 रुपयांत उपलब्ध झाला आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्ही प्लॅट 10 हजार रुपयांची बचत करू शकता. तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही या फोनवर मोठी सूट देखील मिळवू शकता. तथापि, एक्सचेंज डिस्काउंट पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे जर तुमची प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल पण फोनच्या किंमतीमुळे तुम्ही थांबला असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
गूगल Pixel 9 Pro च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 6.3-इंच LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 3,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जाते. तसेच या स्मार्टफोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, त्यात गुगलचा स्वतःचा टेन्सर G4 चिपसेट आहे. याशिवाय, फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 4,700 mAh बॅटरी आहे.
फोटोग्राफीसाठी Google Pixel 9 Pro या डिव्हाईसमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 48MP चा अल्ट्रा वाइड लेंस आणि 5x ऑप्टिकल जूमवाला 48MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.