मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्ससाठी धोक्याची घंटा! सिस्टम हॅक होण्याची शक्यता; सरकारने ॲडव्हायझरी जारी केली
सरकारने मायक्रोसॉफ्ट युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. मायक्रोसॉफ्ट युजर्ससाठी धोक्याची घंटा आहे. मायक्रोसॉफ्टच्या अनेक डिव्हाईसमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हे डिव्हाईस हॅक होऊ शकतो आणि हे डिव्हाईस वापरणाऱ्या युजर्सचा डेटा लिक होऊ शकतो. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने मायक्रोसॉफ्ट युजर्ससाठी हाय-रिस्क वॉर्निंग जारी केली आहे. मायक्रोसॉफ्ट डिव्हाईसमध्ये आढलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन, रिमोट अटॅकर्स वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती लिक करू शकतात. अशा परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे डिव्हाइस नवीनतम OS वर अपडेट करण्याचा सल्ला एजन्सीने दिला आहे.
हेदेखील वाचा- Google Maps : हे आहेत गुगल मॅपव्यतिरिक्त बेस्ट नेविगेशन अॅप्स, नक्की ट्राय करा
मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्ससाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ला मायक्रोसॉफ्ट डिव्हाईसमध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे युजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. ही वल्नरेबिलिटी हॅकर्सना तुमच्या संवेदनशील माहितीवर प्रवेश देऊ शकते. जर वापरकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं तर हॅकर्स तुमचे मोठे नुकसान करू शकतात. सरकारी एजन्सीने वापरकर्त्यांना सुरक्षित राहण्यासाठी आणि असे धोके कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला देखील दिला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
CERT-In च्या मते, ही वल्नरेबिलिटी अनेक मायक्रोसॉफ्ट डिव्हाईससाठी धोकादायक ठरू शकते. यामध्ये Microsoft Windows, Microsoft Office, Microsoft Azure, Developer Tools आणि Microsoft SQL Server यांचा समावेश आहे. एजन्सीने म्हटले आहे की या त्रुटींमुळे अनेक प्रकारच्या सुरक्षेचे उल्लंघन होऊ शकते. या स्थितीत हल्लेखोर डेनियल ऑफ सर्व्हिस (डॉस) सारखी परिस्थितीही निर्माण करू शकतात. तुमची प्रणाली अनियंत्रितपणे ऑपरेट केली जाऊ शकते. जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजिबात योग्य नाही.
मायक्रोसॉफ्ट एज युजर्ससाठी हाय रिस्क वॉर्निंग देखील जारी करण्यात आली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की कार्यसंघाने मायक्रोसॉफ्ट एज (क्रोमियम आधारित) मध्ये उच्च-सुरक्षा वल्नरेबिलिटी शोधली आहे. CIVN-2024-0316, ज्याची नोंद आहे, 129.0.2792.79 पूर्वीच्या मायक्रोसॉफ्ट एजच्या आवृत्त्यांना प्रभावित करते. या Chromium आधारित दोषांचा फायदा घेऊन, रिमोट हल्लेखोर वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा वाजवू शकतात. ॲडव्हायझरी पुढे सांगते की या त्रुटींमुळे हल्लेखोर तुमच्या सिस्टमवर अनियंत्रित कोड अंमलात आणू शकतात.
हेदेखील वाचा- टेलिग्रामने लाँच केलं फोन नंबर व्हेरिफिकेशन फीचर, जाणून घ्या कसे काम करेल
अशा सुरक्षा त्रुटी टाळण्यासाठी, एजन्सीने वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्टने जारी केलेल्या नवीनतम अपडेटवर त्यांचे डिव्हाइस वापरण्याचा आणि कंपनीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.