टेलिग्रामने लाँच केलं फोन नंबर व्हेरिफिकेशन फीचर, जाणून घ्या कसे काम करेल
टेलीग्राम हे एक इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, जे जगभरातील लाखो लोक वापरतात. कंपनी वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म वादात सापडले असले तरी देखील कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. असंच एक नवीन फीचर आता कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी आणलं आहे. आता कंपन्यांना टेलिग्रामद्वारे थेट फोन नंबर व्हेरिफाईड करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
हेदेखील वाचा- Telegram updates policies: टेलिग्राम युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनी तुमची माहिती सरकारसोबत करणार शेअर, काय आहे कारण
अलीकडील ब्लॉग पोस्टमध्ये, टेलिग्रामने ग्राहकांच्या फोन नंबरची पडताळणी करताना व्यवसायांना कराव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल माहिती दिली होती. या व्हेरिफिकेशन सिस्टमची किंमत अनेकदा जास्त असते. आता व्यवसायांच्या या समस्येवर टेलिग्रामने एक उपाय आणला आहे. टेलिग्राम स्वतःचे फोन नंबर व्हेरिफिकेशन फीचर लाँच करत आहे. ज्याचा उद्देश व्यवसाय, ॲप्स आणि वेबसाइट्ससाठी फोन नंबर व्हेरिफिकेशन प्रोसेस अधिक सोपे करणे आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीने म्हटले आहे की, आमच्या अनुभवावरून, आम्हाला ग्राहकाच्या फोन नंबरची व्हेरिफिकेशन करण्यासाठी लागणारा खर्च समजतो. आता कोणताही व्यवसाय टेलिग्रामद्वारे व्हेरिफिकेशन कोड पाठवू शकतो आणि फ्रॅगमेंटद्वारे पेमेंट करू शकतो. टेलीग्रामचा व्हेरिफिकेशन कोड एसएमएस किंवा अधिक वेग, कमी खर्च, प्रदान करतो. ही प्रोसेस इतर पर्यायांपेक्षा सुरक्षित आहे.
हेदेखील वाचा- टेलिग्राम सीईओ Pavel Durov ची अटक योग्य की अयोग्य? काय म्हणाला Elon Musk, वाचा सविस्तर
जेव्हा व्यवसाय व्हेरिफिकेशनसाठी टेलीग्राम वापरतात, तेव्हा युजर्सना ॲपमध्ये डेडिकेटेड चॅटमध्ये कोड प्राप्त होतील. ही सिस्टम युजर्सना एका टॅपने कोड कॉपी करण्याची परवानगी देते, ज्यामुळे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे सोपे होते. व्यवसायांसाठी प्रति वेरिफाइड यूजर किंमत 0.01 डॉलरवर सेट केली गेली आहे, जी SMS-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे आकारलेल्या दरांपेक्षा खूपच कमी आहे.
नवीन व्हेरिफिकेशन वैशिष्ट्यासह, टेलिग्रामने अतिरिक्त अपडेट देखील जारी केली आहेत. आता वापरकर्ते इतरांना भेटवस्तू पाठवू शकतात. वापरकर्ते त्यांना मिळालेल्या भेटवस्तू त्यांच्या टॅबवर दर्शवू शकतात.
भेटवस्तू पाठवण्यासाठी, युजर्स प्राप्तकर्त्याच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश करू शकतात, भेट पर्याय निवडू शकतात आणि त्यांचे संदेश किंवा इमोजी कस्टमाइझ करू शकतात. याशिवाय गिफ्ट पाठवताना यूजर्स आपली ओळख खाजगी ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात. भेटवस्तू कोणी पाठवली हे प्राप्तकर्त्याला कळेल आणि इतरांना प्राप्तकर्त्याच्या प्रोफाइलवर सेंडरचे नाव दिसणार नाही. iOS साठी टेलिग्राम ॲप स्टोअरवर कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहे. या सर्व वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे टेलिग्राम अपडेट करावे लागणार आहे.
टेलीग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी घोषणा केली होती की, मॅसजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्राम आता युजर्सची माहिती सरकारसोबत शेअर करणार आहे. यामध्ये युजर्सचा फोन नंबर आणि आयपी पत्ते यांचा समावेश असणार आहे. खादा टेलिग्राम युजर कोणत्याही बेकायदेशीर हालचाली करत असल्याचे आढळला. तर त्याची माहिती जसे की फोन नंबर आणि आयपी पत्ते सरकारसोबत शेअर केलं जाणार आहे. या निर्णयाचा सामान्य टेलिग्राम युजर्सवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.