
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'Vikram-I रॉकेटचे अनावरण (Photo Credit - X)
‘विश्वसनीयता, क्षमता आणि मूल्य’
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे अंतराळ क्षेत्र वेगाने बदलत आहे आणि देशाने ‘विश्वसनीयता, क्षमता आणि मूल्य’ या त्रिसूत्रीवर आपली ओळख निर्माण केली आहे. “युवा पिढीची नाविन्यता आणि जोखीम घेण्याची क्षमता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात भारत उपग्रह प्रक्षेपणामध्ये (Satellite Launching) जगाचे नेतृत्व करेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
Three years ago today, a beginning was made. The Prarambh of our journey to orbit and beyond. Mission Prarambh: The successful launch of India’s first privately developed rocket, Vikram-S. Now, history beckons again. The orbit calls Vikram-I. 🚀#Skyroot #VikramS #Vikram1 pic.twitter.com/94wZK6Spn8 — Skyroot Aerospace (@SkyrootA) November 18, 2025
संशोधनावर भर
त्यांनी ‘नॅशनल रिसर्च फाउंडेशन’, ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ आणि ₹१ लाख कोटींच्या रिसर्च आणि इनोव्हेशन फंडासारख्या प्रयत्नांद्वारे तरुणांसाठी मोठे संधी निर्माण केल्या जात असल्याचे सांगितले. गेल्या सहा-सात वर्षांत अंतराळ क्षेत्राला अधिक खुले आणि नाविन्यपूर्ण बनवले गेले असून, भारताची क्षमता आता जगातील काही निवडक देशांच्या बरोबरीची आहे, असेही ते म्हणाले.
स्कायरूटचा नवा इन्फिनिटी कॅम्पस काय आहे?
विक्रम-१ रॉकेटची वैशिष्ट्ये
‘विक्रम-१’ हे स्कायरूटचे पहिले ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे, जे छोटे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी बनवले आहे.
| वैशिष्ट्य | माहिती |
| नाव | विक्रम-१ (भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून) |
| आकारमान | २० मीटर उंच, १.७ मीटर व्यास |
| संरचना | पूर्णपणे कार्बन-कॉम्पोझिट सामग्रीने बनलेले |
| क्षमता | मिशननुसार २६० ते ४८० किलोपर्यंतचा भार कक्षेत वाहून नेऊ शकते. |
| लॉन्चची तयारी | २४ ते ७२ तासांत कोणत्याही लॉन्च साइटवरून असेंबल करून प्रक्षेपित केले जाऊ शकते. |
| प्रक्षेपण | एकाच मिशनमध्ये अनेक उपग्रह तैनात करण्याची क्षमता. |
विक्रम-१ ची रचना
विक्रम-१ ची रचना चार टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे:
कंपनीने रॉकेटचे वजन कमी करण्यासाठी आणि निर्मितीचा वेळ वाचवण्यासाठी 3D-प्रिंटेड लिक्विड इंजिनचा वापर केला आहे. ‘विक्रम-१’ ची पहिली चाचणी उड्डाण २०२६ च्या सुरुवातीस प्रस्तावित आहे.