फोटो सौजन्य - pinterest
Battle royale गेम PUBG भारतातील मोबाईल गेमर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात PUBG मोबाईल गेम अनेकांच्या मनोरंजनाचं साधन ठरलं. 2018 मध्ये PUBG ची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढू लागली. PUBG मोबाईलमधील ग्राफीक्स गेमर्सना आकर्षित करते. अद्यापही भारतीयांमध्ये PUBG ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण ट्रेन, बस, घरात PUBG खेळताना दिसतात. तुम्ही PUBG चे नवीन गेमर असाल, तर तुमच्यासाठी टीम मोड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. टीम मोडमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत जास्त काळ मॅचमध्ये टीकून राहण्याची संधी मिळते.
हेदेखील वाचा- ‘या’ दिवशी रिलीज होणार Call of Duty Mobile चा नवीन सीझन! 3 WWE सुपरस्टार गेममध्ये होणार सहभागी
जर तुम्हाला एकटं खेळायला आवडतं असेल तर सोलो मोड तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. पण जर तुम्ही नवीन गेमर असाल तर सोलो मोड खेळणं तुमच्यासाठी थोडं कठीण ठरू शकतं. सोलो मोडमध्ये तुमचं सर्वात मोठं नुकसान असतं ते म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकत नाही. त्यामुळे गेममध्ये जास्त काळ टिकूण राहणं कठिण होतं. पण बॅटलमध्ये उतरण्यापूर्वी तुम्ही काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे प्रत्येक सोलो मॅचमध्ये अव्वल ठराल.
PUBG मधील कोणतीही मॅच जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य ठिकाणी लँड करणं. कारण कोणताही सामना जिंकण्यासाठी चांगली सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत तुम्ही योग्य ठिकाणी उतरणं फार महत्वाचं आहे. खेळाच्या सुरुवातीला, अशा ठिकाणी उतरा जिथे गर्दी कमी आणि लूट जास्त आहे. बॅटलमध्ये उतरताना गेमर्सकडे अतिशय कमी रिसोर्स असतात. त्यामुळे अशावेळी कमी गर्दीच्या ठिकाणी उतरून जास्त लूट करणं सोयीचं ठरतं. गेममध्ये उतरताना शत्रूचा सामना करण्याऐवजी लुट करण्यावर भर द्या.
हेदेखील वाचा- भारतातील 5 बेस्ट हॉरर गेम्स कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या
PUBG मध्ये जिंकण्यासाठी रिसोर्स खूप महत्त्वाची आहेत. आपल्याकडे बंदुका, ग्रेनेड, हीलिंग, बूस्टर आणि इतर पुरवठा असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा सामना करू शकता. त्यामुळे गेममध्ये उतरताना तुम्हाला शत्रुचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या रिसोर्सवर लक्ष द्या.
आवश्यक पुरवठा मिळाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या हालचालींवर आणि खेळातील प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. नकाशावर लक्ष ठेवण्याबरोबरच, शत्रूच्या छोट्या आवाजांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला बंदूकीचा आवाज ऐकू येईल, अशावेळी सावध राहा. अनावश्यक हालचाल आणि गोळीबार टाळा. यामुळे तुम्ही शत्रूंचे टार्गेट ठरू शकता.
गेमच्या आवाजावर लक्ष केंद्रित करा. यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाचे हेडफोन खरेदी केले पाहिजेत. खेळादरम्यान आपण बंदुकीच्या गोळ्या, वाहनांच्या आवाजाने शत्रूचे स्थान शोधू शकतो आणि त्याच्यावर हल्ला करू शकतो. या सर्व गोष्टींबरोबरच नकाशावर लक्ष ठेवा. याच्या मदतीने तुम्हाला सेफ झोन, सप्लाय ड्रॉप लोकेशन आणि शत्रूच्या हालचालींची माहिती मिळत राहील.