तरूणांमध्ये गेम्सची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. गेम्स क्षेत्रात देखील मोठी प्रगती झाली असून अनेक विविध प्रकारचे गेम्स सध्या उपलब्ध आहेत. BGMI, Free Fire Max आणि COD Mobile सारख्या बॅटल रॉयल गेम्सच्या ट्रेंडमध्येही अनेकांना हॉरर गेम्स खेळायला आवडतं. भारतातील 5 बेस्ट हॉरर गेम्स कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का?
फोटो सौजन्य - सोशल मिडीया
अनेकांना हॉरर गेम्स खेळायला आवडतं. भारतातील 5 बेस्ट हॉरर गेम्स कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही हॉरर गेम्सबद्दल सांगणार आहोत. पण जर तुम्हाला हृदयविकार असेल किंवा तुमचे हृदय कमकुवत असेल अशा परिस्थितीत तुम्ही हॉरर गेम्स खेळणं टाळावं.
Amnesia: The Dark Descent हा भारतात उपलब्ध असलेल्या टॉप हॉरर गेम्सपैकी एक आहे. Amnesia: The Dark Descent गेमर्सना एक अनोखा भितीदायक अनुभव देतो. यामध्ये तुम्हाला उत्तम गेमिंग डिझाइन, गेमप्ले, हॉरर ग्राफिक्स, यासांरख्या गोष्टींचा अनुभव घेता येतो.
या यादीतील दुसऱ्या गेमचे नाव आहे Lone Survivor. गेमच्या नावानुसारच गेमर्स या गेममध्ये दीर्घकाळ टीकून राहण्या प्रयत्न करतात. या 8-बिट साइड-स्क्रोलर गेममध्ये तुम्हाला तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. Lone Survivor अनोख्या कथा आणि भीतीदायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
Alien Isolation असं या यादीतील तिसरा गेमचं नाव आहे. या गेममध्ये, खरा एलियन तुम्हाला चित्रपटाच्या भितीदायक वातावरणात घेऊन जातो. या गेममध्ये तुम्हाला अनोखे ग्राफिक्स आणि अतिशय भीतीदायक वातावरण अनुभवायला मिळते.
या यादीतील चौथ्या हॉरर गेमचं नाव आहे Dead Space 2. यामध्येही तुम्हाला अनोखे हॉरर ग्राफिक्स, रोमांचक मोहीम आणि भीतीदायक जगात जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल.