
Realme C85 मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! 7000mAh बॅटरी आणि AMOLED डिस्प्लेने सुसज्ज... मिड रेंजमध्ये मिळणार सॉलिड बिल्ड
Realme ने त्यांच्या C-सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन आता लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स Realme C85 5G आणि Realme C85 Pro 4G या नावाने लाँच करण्यात आले आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची अधिकृत विक्री वियतनाममध्ये सुरु झाली आहे. तर भारतात या स्मार्टफोन्सची प्री-बुकिंग सुरु करण्यात आली आहे. Realme ने त्यांच्या C-सीरीजमधील दोन्ही स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर केले आहेत. हे डिव्हाईस “रग्ड आणि पावर-पॅक्ड” कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे दोन्ही स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी, IP69 रेटिंग, आणि Android 15 आधारित Realme UI 6 देण्यात आहे. त्यामुळे हे स्मार्टफोन्स एका नव्या सेगमेंटची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
Realme C85 5G स्मार्टफोन हाय रिफ्रेश रेट आणि अधिक चांगल्या परफॉर्मंससाठी डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीने या फोनमध्ये 6.8-इंच HD+ LCD डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्स ब्राइटनेस सपोर्ट दिला आहे. हा रिफ्रेश रेट मिडरेंज स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असणं अतिशय दुर्मिळ आहे. याशिवाय हा स्मार्टफोन स्क्रॉलिंग, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक चांगला अनुभव देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे, जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच या डिव्हाईसमध्ये 8GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज, 24GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमच्या पर्याय देखील दिला आहे. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या इतर फीचर्समध्ये डुअल स्पीकर्स, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, NFC सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. फोनचे वजन सुामरे 215 ग्रॅम आहे.
कंपनीच्या या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX852 प्रायमरी रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP सेल्फी शूटर दिला आहे.
Realme C85 Pro 4G ला कंपनीने जास्त प्रीमियम टच दिला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच FHD+ AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले आउटडोर वापरासाठी अतिशय योग्य आहे.
कंपनीच्या या प्रो वर्जनमध्ये Snapdragon 685 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 24GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये 7,000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये IP69 वॉटर-रेसिस्टेंट रेटिंग, डुअल स्पीकर्स, आणि साइड फिंगरप्रिंट सेंसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
Realme म्हणजे कोणती कंपनी आहे?
Realme ही चीनमधील एक प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी आहे, जी प्रामुख्याने परवडणाऱ्या किंमतीत उच्च दर्जाचे स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तयार करते.
Realme कंपनीची स्थापना कधी झाली?
Realme ची स्थापना 2018 साली झाली आणि तिचे मुख्यालय शेन्झेन, चीन येथे आहे.
Realme कोणत्या देशाची कंपनी आहे?
Realme ही चीनमधील कंपनी आहे, परंतु तिची उत्पादन युनिट्स आणि बाजार भारतासह अनेक देशांमध्ये आहेत.
Realme चे लोकप्रिय स्मार्टफोन्स कोणते आहेत?
Realme Narzo सीरिज, Realme C सीरिज, Realme Number सीरिज (उदा. Realme 12, 13, C85) आणि Realme GT सीरिज हे तिचे लोकप्रिय स्मार्टफोन्स आहेत.