नोव्हेंबरमध्ये लाँच होणार Realme GT 7 Pro स्मार्टफोन, Qualcomm च्या लेटेस्ट प्रोसेसरसह करणार एंट्री
Realme ने भारतातील फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 7 Pro ची लाँचिंग कन्फर्म केली आहे. Realme GT 7 Pro नोव्हेंबरमध्ये Qualcomm च्या सर्वात फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. लाँच झाल्यानंतर या स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर केली जाईल. या स्मार्टफोनमध्ये कंपनी 120W चार्जिंग सपोर्टसह 6500 mAh बॅटरी देऊ शकते. फोनमध्ये सोनी कॅमेरा सेन्सर उपलब्ध असतील.
हेदेखील वाचा- सॅमसंगचा स्पेशल एडीशन स्मार्टफोन लाँच, जबरदस्त कॅमेरा आणि डिझाईनही नवं
Realme GT 7 Pro लवकरच भारतात दाखल होणार आहे. हा फोन Qualcomm च्या नवीनतम प्रोसेसरसह आणला जात आहे. कंपनी पुढील महिन्यात फ्लॅगशिप फोन लाँच करणार आहे. Xiaomi, OnePlus, Oppo देखील Qualcomm च्या नवीन चिपसेटसह फोन लाँच करणार आहेत. परंतु Realme ने दावा केला आहे की GT Pro चा AnTuTu स्कोअर या चिपसेटमुळे फोन अधिक पावरफुल बनतो. (फोटो सौजन्य – X)
Realme GT 7 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे. Realme GT 7 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite chipset सह लाँच होणारा पहिला फोन असेल. हा फोन भारतात नोव्हेंबरमध्ये लाँच होईल. सध्या त्याची नेमकी लाँच तारीख समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत कंपनी याबाबत माहिती देऊ शकते. हा फोन या महिन्यात चीनमध्ये लाँच होणार आहे.
Realme GT 7 Pro स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असेल याची पुष्टी झाली आहे. यात Android 15 ऑपरेटिंग सिस्टम आणि 16GB पर्यंत रॅम सपोर्ट असेल. हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
हेदेखील वाचा- तुमच्या OnePlus डेव्हाईसमध्ये ग्रीन लाईन येतेय? आता चिंता मिटली, कंपनीने घेतला मोठा निर्णय
GT 7 Pro हा भारतात Realme चा फ्लॅगशिप फोन असेल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला Realme GT 6 आणि GT 6T लाँच केले होते आणि आता कंपनी शक्तिशाली वैशिष्ट्यांसह Realme GT 7 Pro आणत आहे. Realme GT 6 ची किंमत 40,999 रुपयांपासून सुरू होते. यात तीन प्रकार आणि दोन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आहे. 120W चार्जिंग सपोर्टसह 5,500 mAh बॅटरी देखील आहे फोन 6000 nits च्या अल्ट्रा ब्राइटनेसला सपोर्ट करणारा 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे.