Airtel Recharge Plan: कंपनीच्या या रिचार्ज प्लॅन्समध्ये मिळतात OTT चे फायदे, आता घरबसल्या पहा तुमचे आवडते चित्रपट
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेली Bharti Airtel त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन आणि फायद्याचे प्लॅन लाँच करत असते. याशिवाय कंपनीने आधीच अनेक प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन युजर्सच्या बजेटनुसार आहेत. काही प्लॅन्सची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे तर काही प्लॅन्सची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त आहे. या सर्व प्लॅनमधील एक समान गोष्ट म्हणजे कंपनी त्यांच्या सर्व प्लॅन्समध्ये युजर्ससाठी एक्साइटिंग फायदे ऑफर करत असते. म्हणजेच कधी OTT बेनिफिट्स तर कधी अनलिमिटेड डेटा, अशाच ऑफर्समुळे युजर्सना कंपनीचे हे प्लॅन्स फायदेशीर वाटतात.
आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या प्लॅन्समध्ये OTT बेनिफिट्ससह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंग बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. त्यामुळे या सर्व फायद्यांसह युजर्ससाठी हे प्लॅन्स उत्तम आहेत. 100 रुपयांपासून सुरु होणाऱ्या कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये JioHotstar सब्सक्रिप्शन, 5GB डेटा आणि 30 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये कॉलिंग बेनिफिट्स उपलब्ध नाहीत. याशिवाय 398 रुपये, 449 रुपये, 598 रुपये आणि 838 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील डेली डेटा बेनिफिट्ससह OTT प्लॅन्स ऑफर केले जातात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Airtel च्या 398 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स, 2GB डेली डेटा आणि JioHotstar सब्सक्रिप्शन ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे.
Airtel च्या 449 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना OTT बेनिफिट्स ऑफर करते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 3GB डेली डेटा लिमिट आणि Airtel Xstream Play Premium द्वारे 22+ OTTs चा अॅक्सेस दिला जातो.
तुम्हाला Netflix वरील शो आवडत असतील तर 598 रुपयांचा प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. 598 रुपयांचा रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना Netflix Basic, JioHotstar Super, 2GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केले जाते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
कंपनीच्या 838 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना Amazon Prime Lite सब्सक्रिप्शन ऑफर करते. या प्लॅनमध्ये 3GB डेली डेटा आणि Airtel प्रीपेड यूजर्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग असे फायदे उपलब्ध आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 56 दिवसांची आहे.
लॉन्ग-टर्म रीचार्जमध्ये 979 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स देखील दिले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना Airtel Xstream Play Premium द्वारे 22+ OTT प्लेटफॉर्म्स चा अॅक्सेस, अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स आणि 2GB डेली डेटा ऑफर केला जातो.