
Redmi Note 17 Pro ची किंमत आणि फीचर्स
Redmi Note 17 Pro ची सुरुवातीची किंमत ₹36,999 असून या किंमतीत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ₹39,999 आहे. फोनमध्ये 6.83-इंचाचा 1280×2772 AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश
या फोनमध्ये Snapdragon 6s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी OIS सपोर्ट असलेला 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा मिळतो. विशेष म्हणजे 9,000mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधा आहे. बॉक्समध्ये 67W चार्जर दिला जातो.
Redmi Note 17 Pro Max मध्ये आणखी मोठी बॅटरी
Redmi Note 17 Pro Max मध्येही 6.83-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, पण कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात Snapdragon 6 Gen 5 प्रोसेसर, f/1.5 अपर्चरचा 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो.
फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे 10,000mAh बॅटरी. ती 100W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 27W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. Pro Max ची किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसाठी ₹49,999, तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसाठी ₹55,999 आहे.
दोन्ही फोनना IP66, IP68 आणि IP69K रेटिंग मिळाले असून Android 16 आधारित HyperOS 3 सॉफ्टवेअर आहे. कंपनी 4 प्रमुख OS अपडेट्स आणि 6 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्सचे आश्वासन देते. Redmi Note 17 Pro ची विक्री 17 सप्टेंबरपासून, तर Pro Max ची विक्री 23 सप्टेंबरपासून सुरू होईल.