Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

Redmi M100 Pro Launched: रेडमीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईस 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँत करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2026 | 10:33 AM
लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • रेडमी एम 100 प्रो मध्ये 6.67 इंच कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले
  • स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300-अल्ट्रा प्रोसेसर मिळणार
Redmi Smartphone Launched:  टेक कंपनी Xiaomi ने त्यांच्या Redmi M-सीरीजमध्ये आणखी एका नवीन स्मार्टफोनचा समावेश केला आहे. कंपनीने Redmi M100 Pro हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा नवा मिड-रेंज स्मार्टफोन सध्या केवळ चीनमध्ये लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवर लिस्ट झाला झाला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

रेडमी एम 100 प्रो ची किंमत

नवा रेडमी स्मार्टफोन चीनमध्ये 2,499 युआन म्हणजेच सुमारे 36 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट, सायन आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: X)

हा स्मार्टफोन भारतासह इतर ग्लोबल मार्केटमध्ये कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, सध्या हा स्मार्टफोन केवळ चीनपुरता मर्यादित असणार आहे. हार्डवेअरच्या बाबतीत, रेडमी एम 100 प्रोचे स्पेसिफिकेशन्स जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या रेडमी नोट 14 प्रोसोबत बरेच मिळतेजुळते दिसतात. परिणामी, या फोनकडे रेडमी नोट मालिकेतीलच एक ‘रीब्रँडेड’ मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.

रेडमी एम 100 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, रेडमी एम 100 प्रो मध्ये 6.67 इंच कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत जाऊ शकते. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 देखील देण्यात आले आहे.

प्रोसेसर

परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300-अल्ट्रा प्रोसेसर मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन हायपरओएसवर आधारित आहे.

कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जिथे ओआयएस सपोर्टवाला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

बॅटरी

डिव्हाईसमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये स्टीरियो स्पीकर्स, X-axis लीनियर मोटर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह IR ब्लास्टर आणि NFC सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग देखील मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेडमी एम 100 प्रो स्मार्टफोनची किंमत किती आहे?

    Ans: रेडमी एम 100 प्रो स्मार्टफोन चीनमध्ये 2,499 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 36 हजार रुपये किमतीत लाँच झाला आहे. ही किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे.

  • Que: रेडमी एम 100 प्रो भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: रेडमी एम 100 प्रो च्या भारतातील लाँचबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

  • Que: रेडमी एम 100 प्रो मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7300-अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Web Title: Xiaomi redmi m100 pro launched in china with 50mp camera and 120hz curved oled display hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
1

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके
2

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर
4

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.