Samsung Galaxy A16 भारतात लाँच, 6 वर्षांचे OS अपडेट आणि 5000 mAh बॅटरीसह झाली एंट्री
टेक कंपनी आणि स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Galaxy A16 5G भारतात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा होती. याच्या चर्चेच कारण म्हणजे या स्मार्टफोनला 6 वर्षांचे OS अपडेट देण्यात आलं आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, Galaxy A16 5G स्मार्टफोनला 6 वर्षांचे OS आणि सुरक्षा अपडेट दिले जाणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने Galaxy A16 5G स्मार्टफोन तीन रंगात आणि दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केला आहे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता अॅड करायचा, पण प्रोसेस माहित नाही! नो टेंशन, या स्टेप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर
Samsung Galaxy A16 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फोनचे टीझर जारी करण्यात आले होते. हा मिड-रेंज स्मार्टफोन 6 वर्षांच्या OS अपग्रेडसह येतो. फोन नॉच डिस्प्ले सह येतो. लेटेस्ट स्मार्टफोन गोल्ड, लाइट ग्रीन आणि ब्लू ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 25W चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी बॅटरी आहे. (फोटो सौजन्य – Samsung)
Samsung Galaxy A16 5G च्या बेस व्हेरिएंट 8GB + 128GB ची किंमत 18,999 रुपये आहे. तर त्याचा 256GB व्हेरिएंट 21,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आला आहे. पहिल्या सेलमध्ये, Axis आणि SBI बँकेच्या कार्डधारकांना 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. Samsung Galaxy A16 5G स्मार्टफोन सॅमसंगच्या रिटेल स्टोअर्स, Samsung.com, Amazon आणि Flipkart वरून खरेदी केला जाऊ शकतो.
डिस्प्ले – Galaxy A16 5G मध्ये 6.7 इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेट आणि 1080 X 2340 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
प्रोसेसर – स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी MediaTek डायमेंशन 6300 चिपसेट आहे.
रॅम आणि स्टोरेज – फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे 1.5 TB पर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेरा – फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मागील पॅनलवर 2MP मॅक्रो लेन्स आहेत. सेल्फीसाठी यात 13MP कॅमेरा आहे.
हेदेखील वाचा- गुगलमध्ये आणखी एका भारतीयाचा डंका! कोण आहेत प्रभाकर राघवन, ज्यांना सुंदर पिचाई यांनी गुगलमध्ये दिली मोठी जबाबदारी?
OS – Galaxy A16 5G फोन One UI 6.1.1 आधारित Android 14 वर चालतो. यात 6 वर्षांपर्यंत OS आणि सुरक्षा अपडेट दिली जात आहेत.
बॅटरी आणि चार्जिंग– फोनमध्ये 25W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी आहे.
इतर फीचर्स– स्मार्टफोन ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, NFC, USB टाइप सी पोर्ट आणि IP54 रेटिंगसह येतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
डिझाईनच्या बाबतीत, फोन मागील Galaxy A15 सारखा दिसतो. यामध्ये फ्लॅट एज डिस्प्ले आणि नॉच कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रॅम आणि स्टोरेज वाढवण्यात आले आहे. तसेच, सेगमेंटमध्ये 6 वर्षांची OS पॉलिसी देखील नवीन आहे.