सॅमसंगकडून भारतातील ग्राहकांसाठी बीस्पोक AI वॉशिंग मशिन्स लाँच, काय आहे किंमत वाचा
इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने १० मोठ्या आकाराच्या, फ्रण्ट लोड AI वॉशिंग मशिन्सची नवीन श्रेणी लाँच केली आहे. मशिन्समधील AI पॉवर्ड लाइन अप भारतातील ग्राहकांसाठी लॉण्ड्री केअरमधील नवीन युगाची खात्री देते आणि सर्वोत्तम AI वैशिष्ट्यांच्या माध्यमातून कपडे धुण्याचे काम अधिक सोपे करते. या नवीन, मोठ्या वॉशिंग मशिन्स १२ किग्रॅच्या योग्य आकारासह येतात, ज्यामुळे भारतातील ग्राहक एकाच वेळी अधिक कपडे धुवू शकतात. सॅमसंगच्या या AI वॉशिंग मशिन्स ब्लँकेट्स, पडदे व साड्या अशा मोठ्या कपड्यांना धुण्यासाठी अनुकूल आहेत. सॅमसंग इंडियाच्या नवीन १२ किग्रॅ AI वॉशिंग मशिन्सच्या श्रेणीची किंमत ५२,९९० रूपयांपासून सुरू होते. नवीन आधुनिक वॉशिंग मशिन्स बीस्पोक डिझाइनसह फ्लॅट ग्लास डोअर आणि प्रगत AI वैशिष्ट्ये जसे AI वॉश, AI एनर्जी मोड, AI कंट्रोल व AI इकोबबलसह लाँच करण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा- Zomato ने लाँच केलं Book Now Sell Anytime फीचर! कसं करणार काम आणि काय आहे खास, जाणून घ्या
बीस्पोक AI वॉशिंग मशिन्सच्या लाँचिंगप्रसंगी सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे वरिष्ठ संचालक सौरभ बैशाखिया यांनी सांगितलं की, भारतातील ग्राहक आधुनिक डिजिटल अप्लायन्सेसचा शोध घेत आहेत, जे कमी प्रयत्नासह दर्जात्मक वॉश कार्यक्षमता देईल. तसेच वीज व वेळेची बचत करू शकेल. आमच्या नवीन १२ किग्रॅ AI पॉवर्ड वॉशिंग मशिन्स ग्राहकांना एकाच वेळी मोठे लॉण्ड्री लोड्स धुण्याची सुविधा देतात, ज्यामधून त्यांना ‘डू लेस अँड लिव्ह मोअर’ची खात्री मिळते. फ्रण्ट लोड बीस्पोक AI वॉशिंग मशिन्सची नवीन श्रेणी सोईस्कर व कार्यक्षम वॉश देत इतरांपेक्षा वेगळी ठरत आहे. प्रीमियम बीस्पोक AI वॉशिंग मशिन श्रेणीसह आमची कार्यक्षमता, सोईस्करपणा व स्टाइलला महत्त्व देणाऱ्या आणि उच्च क्षमतेच्या वॉशिंग मशिन श्रेणीला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणार आहे.
सॅमसंगच्या बीस्पोक AI वॉशिंग मशिन्स २.८ दशलक्ष बिग डेटा पॉइण्ट्सचा फायदा घेत स्मार्टथिंग्ज अॅपच्या एकीकरणासह सानुकूल वॉश पर्याय देते. तसेच या वॉशिंग मशिन्स प्रत्येक वॉश चक्रामध्ये वीजेची मोठ्या प्रमाणात बचत करतात. AI एनर्जी मोड जवळपास ७० टक्के वीज बचत करतो. बीस्पोक AI वॉशिंग मशिन वापरकर्त्यांची कपडे धुण्यासाठी लागणारी मेहनत कमी करते. तसेच बीस्पोक AI वॉशिंग मशिन्समधील AI -पॉवर्ड वैशिष्ट्यांची संपूर्ण श्रेणी वापरकर्त्याच्या जीवनशैलीमध्ये अधिक उत्साहाची भर करते.
बीस्पोक AI वॉशिंग मशिन प्रगत सेन्सिंगचा वापर करत कपड्याचे वजन व सॉफ्टनेस ओळखते, तर सॉइल लेव्हल ट्रॅकिंग वॉटर टर्बिडीटीच्या आधारावर मातीच्या डागांना सक्रियपणे ओळखते आणि कपड्यांना खोलवर, पण सौम्यपणे धुण्यासाठी पाणी व डिटर्जंटचा सानुकूल वापर करते. ऑटो डिस्पेन्स वैशिष्ट्य आपोआपपणे योग्य प्रमाणात डिटर्जंट व फॅब्रिक सॉफ्टनर रीलीज करते, ज्यामुळे कपड्यांचे नुकसान होत नाही. स्मार्टथिंग्ज अॅपच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या AI एनर्जी मोडसह तुम्ही तुमच्या होम अप्लायन्सेसच्या ऊर्जा वापराचे व्यवस्थापन करू शकता आणि प्रक्रियेमध्ये पैशांची बचत करू शकता. AI कंट्रोल वैशिष्ट्य हॅबिट लर्निंगच्या माध्यमातून ग्राहकांच्या कपडे धुण्याच्या पद्धती जाणून घेत त्यांच्याशी जुळले जाते आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल असलेल्या वॉश चक्रांबाबत सल्ला देते.
हेदेखील वाचा- LinkedIn वरील ‘या’ चिमुकल्याचं अकाऊंट पाहिलत का? नेटवर्कच आहे नेट वर्थ!
स्मार्टथिंग्ज गोइंग आऊट मोड वापरकर्त्यांना दुरूनच त्यांच्या कपडे धुण्याच्या प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याची सुविधा देते, जेथे कपडे धुण्याच्या वेळेबाबत चिंता करण्याची गरज भासत नाही. वापरकर्ते त्यांच्या गॅलॅक्सी स्मार्टफोनवरील पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून कपडे धुण्याची प्रक्रिया रिशेड्यूल करू शकतात. कपडे धुण्याचे चक्र पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग मशिनमधून कपडे बाहेर काढले नाही तर ते लॉण्ड्री अलार्म रिमाइंडर पाठवते. त्यानंतर वापरकर्ते त्यांच्या कपड्यांमधून येणाऱ्या दुर्गंधींना प्रतिबंध करण्यासाठी रिन्स + स्पिन चक्र सुरू करू शकतात. स्मार्टथिंग्ज होम केअर मशिनच्या कार्यक्षमतेवर देखरेख ठेवते, वापरकर्त्यांना सक्रियपणे गॅलॅक्सी डिवाईसेसवर देखरेख आणि समस्या निवारण टिप्स देते.
सुपरस्पीड पर्याय कपडे धुण्याची वेळ ३९ मिनिटांनी कमी करते, यावेळी वॉश कार्यक्षमतेवर कोणतीच तडजोड होत नाही. तसेच, क्यू-बबल आणि स्पीड स्प्रे यांसारखी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये उत्तम क्लीनिंग व कार्यक्षम रिन्सिंगची खात्री देतात. डिजिटल इन्व्हर्टर तंत्रज्ञानाच्या शक्तीसह या वॉशिंग मशिन्स ऊर्जा कार्यक्षमता, कमी आवाज आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेची खात्री देतात, ज्यांना २० वर्षांच्या वॉरंटीचे (मोटरवर) पाठबळ आहे. बीस्पोक AI वॉशिंग मशिन्स आकर्षक आहेत आणि त्यांचे प्रीमियम लुक कोणत्याही आधुनिक इंटीरिअरसोबत फीट होऊ शकतात.
बीस्पोक AI वॉशिंग मशिन्स सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्टोअर Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप, रिटेल स्टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. बीस्पोक AI वॉशिंग मशिन्सची किंमत ५२,९९० रूपयांपासून ते ८०,९९० रूपयांपर्यत आहे. सॅमसंग फायनान्स+च्या मदतीसह ग्राहक ईमएआयच्या माध्यमातून देखील नवीन वॉशिंग मशिन्स खरेदी करू शकतात.