Zomato ने लाँच केलं Book Now Sell Anytime फीचर! कसं करणार काम आणि काय आहे खास, जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅप Zomato लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. Zomato ची उत्तम सर्विस आणि चांगल्या प्रतीचे अन्न यामुळे लोकं नेहमीच Zomato ला प्राधान्य देतात. त्यामुळे Zomato देखील आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स लाँच करत असते, ज्यामुळे युजर्सना Zomato वरून फूड ऑर्डर करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. आता देखील Zomato ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. Book Now Sell Anytime असं या फीचरचं नाव आहे. Zomato चे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या नवीन फीचरबाबत माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- आता आधीच शेड्यूल करता येणार Zomato ची ऑर्डर! कंपनीने लाँच केलं नवीन फीचर
Zomato लवकरच Book Now Sell Anytime फीचर तिकीटिंग प्लॅटफॉर्मवर लाँच करणार आहे. हे फीचर वापरकर्त्यांना त्यांची खरेदी केलेली तिकिटे थेट Zomato ॲपद्वारे पुनर्विक्री करण्यास अनुमती देते. हे वैशिष्ट्य Zomato ॲपवर 30 सप्टेंबर रोजी Zomato Feeding India Concert (ZFIC) मध्ये लाँच केलं जाणार आहे. या फीचरची घोषणा कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केली आहे.
Pre-sale for the Zomato Feeding India Concert with @DUALIPA goes live NOW for all HSBC card holders. Good time to reconnect or make friends with HSBC card holders 😉
Thank you @HSBC_IN team for your support in making ZFIC possible. You have our love and gratitude.
Lastly, an…
— Deepinder Goyal (@deepigoyal) August 27, 2024
हेदेखील वाचा- Zomato ने खरेदी केली Paytm ची तिकीट सिस्टम! आता Paytm वरून तिकीट बुक होणार नाही
Book Now Sell Anytime वैशिष्ट्यासह, लोकांना तिकीट सहजपणे बुक करणे आणि त्यांना गरज नसताना त्यांची विक्री करणे सोपे करण्याचा कंपनीचा हेतू आहे. याचे स्पष्टीकरण देताना कंपनीने सांगितले की, ॲडव्हान्स तिकीट बुक करताना अनेक अज्ञात गोष्टी असतात, मी देशाबाहेर असलो तर? माझे मित्र जाऊ शकत नसतील तर? मला ज्या लग्नाला हजर राहायचे होते ते मी विसरलो तर? त्यामुळे इतर कशाचीही चिंता न करता कोणत्याही कार्यक्रमाची तिकिटे बुक करणे आम्हाला शक्य तितके सोपे बनवायचे आहे. म्हणूनच आम्ही आमचे स्वतःचे ‘ Book Now Sell Anytime’ वैशिष्ट्य तयार केले आहे. हे वैशिष्ट्य ऑफर करणारे Zomato पहिले भारतीय तिकीट प्लॅटफॉर्म ठरले आहे.